मनपा स्वीकृत निवड : ‘शिवसेनेच्या’ दोघांची नावे चर्चेत

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीसाठी नामनिर्देश सादर करण्याची आजची अंतिम मुदत आहे. सभेत पाच सदस्यांच्या निवडी होणार असून,

यात शिवसेनेकडून दोन सदस्यांची नावे बंद पाकिटात नगरसचिव कार्यालयात सादर करण्यात आली आहेत. महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी स्व. अनिल भैया राठोड यांनी मदन आढाव व संग्राम शेळके यांना शब्द दिला होता. हा शब्द कायम ठेवत या दोघांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

शिवसेनेकडून मदन आढाव संग्राम शेळके या दोघांची नावे यापूर्वी झालेल्या बैठकीतच सुचविण्यात आली होती. दरम्यान अनिल राठोड यांचे निधन झाल्याने त्यांचे चिरंजीव विक्रम यांना संधी द्यावी अशी पक्षातून मागणी पुढे आली होती. भाजपकडून रामदास आंधळे, किशोर डागवाले व सुवेंद्र गांधी यांची नावे चर्चेत आहेत.

एका जागेसाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असून, प्रदेशाध्यक्षांपर्यंत या विषय नेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. प्रदेशाध्यक्षांकडूनच नाव अंतिम होईल, असा दावाही भाजपचे स्थानिक पदाधिकारी करत आहेत. त्यामुळे कुणाचे नाव निश्चित होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

किशोर डागवाले यांनी भाजप व राष्ट्रवादीकडून स्वीकृतसाठी इच्छुक नसल्याचे जाहीर केले असले, तरी त्यांचे नाव अद्यापही चर्चेत असल्याचे बोलले जाते. भाजपकडून संधी न मिळाल्यास राष्ट्रवादीकडून ते सभागृहात जातील अशी चर्चा सुरूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मागील वेळी विपुल शेटीया व बाबासाहेब गाडळकर यांचे नाव देण्यात आले होते.

शेटीया यांचे नाव कायम राहील, असे सांगितले जात आहे. दरम्यान किशोर डागवालेंना संधी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा भाजपला धक्का देणार का? याबाबत मनपा वर्तुळात उत्सुकता आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment