अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हरेरी लावलेली आहे. दरम्यान पावसामुळे संगमेनर शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेले आहे. या खड्यांच्या प्रश्नावरून मनसे ने आक्रमक भूमिका घेतली आहे.
शहरामधील रस्त्यांवरील खड्डे पाच दिवसांत बुजवा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

यासंदर्भात मनसेच्यावतीने आज नगरपालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांना खड्डे बुजविण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, सचिव डाॅ.संजय नवथर, सरचिटणीस तुषार बोबडे, सुरेश जगताप,
सुभाष सोनवणे, सचिळ पाळदे उपस्थित होते. शहरातील सर्वच रस्त्यांची खड्ड्यामुळे मोठी दुरावस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्यामुळे अपघात होऊन कित्येकजण जखमी होतात.
शहरातील अनेक रस्ते सहा महिन्यापूर्वी नव्याने तयार करण्यात आले. परंतु संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली.
संबधित ठेकेदाराच्या कामाची चौकशी करुन निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करावी. तसेच सदर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून काम देणे बंद करण्याची मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
खड्यांमुळे प्रवाशांना जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागतो. आता खड्यामुळे अपघात झाल्यास आणि जीव धोक्यात आल्यास नगरपालिकेला जबाबदार धरुन पालिकेविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved