अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- महानगरपालिकेमध्ये स्विकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून शहर शिवसेनेत दोन गट असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. या सुरु असलेल्या चर्चसंदर्भात विरोधी पक्ष नेते संजय शेंडगे यांनी आपली प्रतिक्रिया देत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे.
नगर शिवसेनेचे खंबीर नेतृत्व दिवंगत अनिल भैय्या राठोड यांच्या निधनानंतर शिवसेनेतील गटबाजीच्या चर्चा सध्या बाहेर येऊ लागल्या आहेत. या गटबाजीच्या शहरात उलट सुलट चर्चा होत आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर बोलताना शेंडगे म्हणाले कि, शिवसेनेत कधीही जातीयवादाला थारा दिला जात नाही.
उलट नगरची शिवसेना एकसंधच आहे, असे सांगत शेंडगे यांनी सावेडी विभाग प्रमुख काका शेळके यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. पक्षाकडून स्वर्गीय अनिल भैय्या राठोड यांनी शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्याकडे दिलेली नावेच यावेळी पुन्हा देण्यात आली आहेत.
सध्या कार्यरत असलेले संपर्कप्रमुख हे वरिष्ठांचे आदेश पाळणारे एक सच्चे शिवसैनिक आहेत. आजवर त्यांनी पक्षातील अनेक महत्वाची पदे उपभोगली आहेत. सर्वांना एकत्र करून संघटना वाढीसाठी काम करण्याचा त्यांना दांडगा अनुभव देखील आहे.
यामुळेच नगर येथे संपर्कप्रमुख कार्यरत झाल्यापासुन शिवसेनेने एकदा महापौरपदी व दोनदा पोटनिवडणुकीत भगवा फड़कवला आहे. तरीदेखील स्थानिक पातळीवरील राजकारणात काही पदाधिकाऱ्याच्या मर्जीप्रमाणे काही गोष्टी न घडल्यास आरडाओरड सुरु होते.
संपर्कप्रमुख व शिवसेनेतील काही नगरसेवकांना नाहक बदनाम करण्याचे कारस्थान ते सातत्याने रचतात. त्यांनी नसत्या उठाठेवी व पक्ष श्रेष्ठींना बदनाम करण्यापेक्षा शिवसेनेच्या ऐक्यासाठी विरोधकांना मुहतोड उत्तर देण्यासाठी कठोर कार्य करावे व आपआपसात हेवे दावे करणे थांबवावे, असे आवाहन शेंडगे यांनी केले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved