अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेल्या गळतीमुळे पक्षाचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार प्रचंड अस्वस्थ आहेत. याचा प्रत्यय शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत आला.
एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत आता नातेवाईकही (डॉ. पद्मसिंह पाटील) सोडून जात असल्याबद्दल विचारले आणि पवारांचा पारा चढला.

त्या पत्रकारावर डाफरून पवार चक्क उठून निघू लागले. नंतर काही जणांनी समजूत काढल्यावर त्यांनी पुन्हा राग गिळून पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
पद्मसिंह पाटील भाजपच्या वाटेवर आहेत. याबद्दल पत्रकाराने विचारले तेव्हा पवार भडकले. “इथs नातेवाईकांचा प्रश्न येतोच कुठं? असे प्रश्न तुम्ही कसे काय विचारू शकता?
माफी मागा’ असे म्हणत पवार उठून निघाले. मात्र, सोबतच्या नेत्यांनी त्यांना व प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला शांत केले.
किमान सभ्यता न पाळणाऱ्या लोकांना तुम्ही बोलवत जाऊ नका. त्यांना बोलवायचे असेल तर मग मला बोलावू नका. आपण गेलात तर बरे होईल, असेही पवारांनी संबंधित पत्रकाराला हात जोडून सांगितले. ‘
ही घटना घडल्यानंतर तो पत्रकार म्हणाला मी माफी मागण्याचा येथे प्रश्नच उद्भवत नाही. एखाद्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे की नाही हा अधिकार तर आपलाच आहे.
- जमीन खरेदी विक्रीच्या नियमांत मोठा बदल, ‘हे’ 4 नवीन नियम तुम्हाला माहिती असायलाच हवेत !
- IDBI Bank Bharti 2025: IDBI बँक अंतर्गत 650 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- 61 रुपयांच्या ‘या’ स्टॉकने 17,757% रिटर्न ! 1 लाखाचे झालेत 1.87 कोटी, तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये आहे का?
- लँड क्रूझर आणि फॉर्च्युनरमधून भीक मागायला जाणाऱ्या कुटुंबाची गोष्ट !
- EPFO च्या बैठकीत मोठा निर्णय PF व्याजदर कमी होणार