अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- शहरात तसेच आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत आहे.
दिवसेंदिवस अवैध धंदे करणारे खुलेआम आपली कामे करू लागली आहे. यातच आज पोलीस पथकाने भिंगार मध्ये सुरु असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकला व जुगार खेळणाऱ्या जुगाऱ्यांना अटक केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, भिंगारच्या सावतानगरमध्ये सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांनी रेड करत 19 जुगार्यांना अटक केली.
त्यांच्याकडून रोकड, मोटारसायकल असा सुमारे दोन लाख रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांना सावतानगरमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली.
पीएसआय पंकज शिंदे यांच्या पथकाला त्यांनी रेड टाकण्याचे आदेश दिले. सावतानगरमधील घराच्या अडोशाला सार्वजनिक ठिकाणी जुगाराचे दोन डाव बसल्याचे पोलिसांना दिसले.
रोकड, पत्ते असा सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त करत 19 जुगार्यांना अटक केली. भिंगार पोलिसांत रात्री उशिराने यासंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved