भाजप पदाधिकारी निवडीवर आक्षेप लवकरच पुढील दिशा ठरवणार

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  जनाधार नसलेली मंडळी नेत्यांच्या पुढे पुढे करुन पदे पटकावतात. साखर कारखाना संचालक, जिल्हा नियोजनचे सदस्य, तसेच पूर्वी तालुकाध्यक्ष असलेल्या व्यक्तीलाच पुन्हा संधी मिळाली.

चळवळीत काम करणाऱ्या व संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलले गेले, असे सांगत पुढील दिशा ठरवण्यासाठी लवकरच सर्व बूथप्रमुखांची व शक्तीकेंद्र प्रमुखांची बैठक घेऊन निर्णय घेऊ, अशी माहिती सचिन ढोबळे,बाळासाहेब हिवराळे व सोमनाथ कदम यांनी गुरुवारी दिली.

भाजप तालुकाध्यक्षपदी बबनराव मुठे, तर शहराध्यक्षपदी मारुती बिंगले यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोदकर यांनी जाहीर केली. अन्य सर्व तालुकाध्यक्षांची निवड यापूर्वीच झाली. श्रीरामपूर निवड जिल्हा कोअर कमेटीपुढे व जिल्हा कोअरकडे गेली होती. एकमत न झाल्याने निवडीचा चेंडू प्रदेशाध्यक्षांकडे गेला.

नव्या निवडीचा माजी तालुका सरचिटणीस ढोबळे, माजी युवा मोर्चा शहराध्यक्ष हिवराळे, शहर मंडलाचे माजी सरचिटणीस कदम यांनी निषेध केला. पत्रकात म्हटले आहे, दोन्ही मंडलाध्यक्ष निवडताना बूथप्रमुख व शक्ती केंद्रप्रमुखांना विश्वासात घेतले नाही. कार्यकर्त्यांच्या मनाविरुद्ध या निवडी झाल्या.

निवडी पक्षाच्या नियमाप्रमाणे नाहीत. शक्ती केंद्रप्रमुख व बूथप्रमुखांनी मागील ५ वर्षांत जनतेची अनेक कामे मार्गी लावली. त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय झाला असून याची मोठी प्रतिक्रिया भाजपचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये उमटली आहे. श्रीरामपूर मंडल अध्यक्षांच्या निवडी पक्षाच्या घटनेप्रमाणे सर्व बूथप्रमुखांना विचारुन व निवड प्रक्रिया राबवून होणे गरजेचे होते.

जाहीर झालेल्या मंडल अध्यक्षांच्या निवडी नियमबाह्य असून तळागाळात काम करणाऱ्या पक्षाच्या संघटनेच्या विरोधात झालेल्या असल्याने बूथप्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुखांना मान्य नाही. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात एकूण ३१० बूथप्रमुख आहेत.

या सर्वांचे मत विचारात घेऊन निवड व्हायला हवी होती. मात्र, तशी ती झाली नाही. येत्या एक-दोन दिवसांत बूथ प्रमुखांची बैठक घेऊन पुढील दिशा ठरवण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment