अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- 5 एप्रिल 2015 रोजी शफीक शब्बीर शेख (रा. नारायणगव्हाण ता. पारनेर) या आरोपीने बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती.
या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी व 50 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. सदर खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने सहा साक्षिदार तपासण्यात आले.
पिडीत मुलगी, तिचा भाऊ, पंच, तपासी अंमलदार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. न्यायालयासमोर आलेला साक्षी-पुरावे, कागदोपत्री पुरावा व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस सदर शिक्षा ठोठावली.
5 एप्रिल 2015 रोजी आरोपी शेख याने नगर शहरात राहणार्या अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्याशी गैरवर्तन केले. तसेच बंदुकीचा धाक दाखवून
शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी शेख विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved