काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक; युपी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  उत्तरप्रदेश मध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर देशामध्ये संतापाची लाट उसळली आहे. मयत पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघालेल्या राहुल गांधींना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली.

याच निषेध म्हणून देशभर ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाथर्डी येथे येथे वसंतराव नाईक चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने उत्तर प्रदेश सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.

यावेळी गांधी यांना झालेल्या धक्का बुक्कीचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. भाजपच्या केंद्रातील सरकारच्या विरोधी यावेळी घोषणाबाजी केली. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासीर शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी उत्तर प्रदेश व केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून याघटनेचा तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त करत योगी आणि मोदींवर हल्ला चढवला.

या आंदोलन प्रसंगी प्रकाश शेलार,संजय डांगे, राजेंद्र बोरुडे,जालिंदर काटे,अजिज शेख, जावेद पिंजारी, अमोल गाडे, सुरेश नगरकर ,वसंत खेडकर,

समीर शेख,असलम सय्यद ,रवी पालवे,रोहिदास खेडकर,सरफराज चौधरी, अल्ताफ शेख ,डॉ योगीराज देशमुख, डॉ सुरेश आव्हाड,सिकंदर शेख आदी सहभागी झाले होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment