कोरोनामुळे ‘बापूंना’ विसरले सरकारी कर्मचारी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  इंग्रजांच्या काठ्या खाल्या, जेलमध्ये गेले मात्र कोणत्याही संकटाला न घाबरता देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. अशा राष्ट्रपिता महात्मा गांधींचा आज जन्मदिवस आहे.

नियमांचे पालन करत देशभर बापूंची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र जिल्ह्यातील अकोले मध्ये सरकारी कर्मचारी मात्र घरी निवांत बसून सुट्टीचा आनंद घेताना दिसले.

कोरोनामुळे सरकारी कार्यालयात शुकशुकाट आहेच. परंतु आज राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती सरकारी नियमात गांधी जयंतीच्या दिवशी सरकारी कार्यालयात येऊन गांधी जयंती साजरी करून महात्मा प्रति आदरभाव आवश्यक आहे.

अकोले तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, महिला बाल कल्याण, अंगणवाडी प्रकल्प कार्यालय या कार्यालयांना चक्क ११ वाजता कुलूप होते.

शांती, अहिंसा, सहिष्णुता शिकवणारे राष्ट्रपिता गांधी कोरोनामुळे दूर गेलेत की काय अशीच स्थिती आजच्या दिनी पाहायला मिळाली. बापूंना वंदन करण्यापेक्षा अधिकारी, कर्मचारी यांनी घरातच राहणे पसंत केले.

मात्र शाळा, कॉलेजमध्ये अधिकारी नसले तरी शिपाईना पाठवून गांधींना पुष्पहार घालून नारळ वाढविला हे विशेष. मात्र, बेजबाबदार अधिकाऱ्यांना याचे काही घेणे देणे नसल्यासारखेच चित्र आज पाहायला मिळाले.

दरम्यान तहसीलदार मुकेश कांबळे म्हणाले, गांधी जयंती साजरी करणे हे सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयास बंधनकारक आहेच.

मात्र याबाबत कुणी हलगर्जीपणा केला असेल तर त्याची माहिती घेऊन वरिष्ठांना अहवाल पाठविला जाईल. याची संबंधितांनी नोंद घ्यावी. मी सकाळी कार्यालय वेळेत राष्ट्रपिता म. गांधी यांना वंदन केले आहे .

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment