अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये चढउतार दिसून आले. गेल्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये बराच बदल झाला होता.
सोन्या-चांदीच्या किंमती सतत खाली येत आहेत. म्हणूनच जर तुम्हाला सोने घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे.
सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव १६४ रुपयांनी कमी झाला असून तो ५०१७० रुपयांवर आला आहे. चांदीच्या दरात देखील सकाळच्या सत्रात घसरण झाली होती.
मात्र आता चांदीचा भाव सावरला आहे. चांदीचा भाव एक किलोला १४५ रुपयांनी वधारला असून तो ६००६४ रुपये झाला आहे. जागतिक बाजारात आज सोन्याचा भाव १८८४.६७ डॉलर प्रती औंस झाला.
चांदीचा भाव प्रती औंस २३.२५ डाॅलर आहे. याआधी ७ ऑगस्ट रोजी कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव ५६२०० रुपये प्रती १० ग्रॅम इतका विक्रमी स्तरावर गेला होता.
मात्र जागतिक बाजारातील अस्थिरतेने सोने दरात ७००० रुपयांची घसरण झाली आहे. इतर चलनांच्या तुलनेत डॉलरचे मूल्य मजबूत होत असल्याने सोने आणि चांदीमध्ये घसरण झाली होती.
कुठे आहे किती दर ? ( गुरुवारचे दर )
- १) मुंबई – २२ कॅरेट ४८९०० रुपये , २४ कॅरेट ४९९०० रुपये.
- २) दिल्ली – २२ कॅरेट ४८९५० रुपये , २४ कॅरेट ५३४२० रुपये.
- ३) कोलकाता – २२ कॅरेट ४९५६० रुपये, २४ कॅरेट ५२४७० रुपये.
- ४) चेन्नई – २२ कॅरेट ४८२५० रुपये, २४ कॅरेट ५२६४० रुपये.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved