तब्बल 14 वर्षांनी जिल्ह्यातील या धरणात असे काही घडले…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  गेल्या काही महिन्यात जिल्ह्यात पावसाने दमदार हजारेरी लावली होती. यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये तसेच नद्या, ओढे, तलाव हे पाण्याने तुडुंब भरल्याचे चित्र पाहायला मिळाले.

नुकताच मुळा नदीपात्रात दोन हजार क्युसेकने विसर्ग सुरु केला आहे. यंदा ‘मुळा’तून जायकवाडी धरणात आजपर्यंत 13 हजार 426 दशलक्ष घनफूट पाणी गेले.

मुळा धरणात 25 हजार 979 दशलक्ष घनफूटसाठा स्थिर ठेवून, नवीन येणारे पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. नदीपात्रातून जायकवाडीला

13,426; उजव्या कालव्यातून 1758; डाव्या कालव्यातून 107 व वांबोरी योजनेतून 91 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आल्याची माहिती धरण शाखाधिकारी अण्णासाहेब आंधळे यांनी दिली.

‘मुळा’ च्या लाभक्षेत्रात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे. भूगर्भातील पाणीपातळी वाढली आहे. विहिरी व कूपनलिका तुडुंब भरलेल्या आहेत.

त्यामुळे, रब्बी हंगामात सिंचनासाठी पाण्याची मागणी कमी राहणार आहे. सलग दुसऱ्या वर्षी धरण भरल्याने लाभक्षेत्रातील पाण्याचा दुष्काळ हटला आहे. 15 ऑक्टोबर रोजी धरण पूर्ण क्षमतेने 26 हजार दशलक्ष घनफूट भरले जाईल.

नंतर, धरणातील वर्षभराच्या पाणी वापराचे नियोजन होईल. थेट धरणातून पिण्याच्या पाणी योजना, औद्योगिक वापराचे पाणी, बाष्पीभवन, अचल साठा वगळता सिंचनासाठी 14 हजार 500 दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध होईल.‌

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment