‘कोरोना विषाणूच्या नावाखाली खासगी हॉस्पिटलची दुकानदारी’

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :-शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना खाजगी हॉस्पिटलमध्ये सुरु असलेले कोविड सेंटरकडून रुग्णांच्या नातेवाईकांकडून बीलापोटी अधिक पैश्याची मागणी केली जात आहे.

अशा कोविड सेंटरवर साथ रोग नियंत्रण कायद्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याची मागणी विनोद गायकवाड यांनी केली आहे. कोरोना रुग्णांसाठी शासकीय दर निश्चित केले असताना सुध्दा खाजगी कोविड सेंटरमध्ये अंधाधुंदी कारभार सुरु आहे.

कोरोनाच्या नावाखाली खाजगी हॉस्पिटलने दुकानदारी सुरु केली असून, सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक होत आहे. रुग्णांकडून हॉस्पिटल प्रशासन तर ऑडिटर हॉस्पिटलद्वारे मलिदा लाटत आहे. या साखळीमध्ये सर्वसामान्य रुग्णाचे कुटुंबीय भरडले जात आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment