Ahmednagar Politics : विखे-कोल्हेंना टक्कर द्यायला अजितदादांचा भिडू मैदानात, शिक्षक विधानपरिषदेसाठी अहमदनगरमधील आणखी एक दिग्गज नेता रिंगणात

Ajay Patil
Published:
ahmednagar politics

Ahmednagar Politics : नाशिक विभाग शिक्षक विधानपरिषदेची निवडणूक दि. २६ जून २०२४ रोजी होत आहे. यासाठी आता अहमदनगर, नाशिक मधील अनेक राजकीय दिग्गज मैदानात उतरले आहेत. आता अजित पवार गटाचे श्रीगोंद्यातील नेते दत्ता पानसरे यांनी नाशिक शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी तयारी सुरु केलीये.

दत्ता पानसरे यांच्या एन्ट्रीमुळे आता विवेक कोल्हे आणि राजेंद्र विखे यांच्यात अजित दादांचा तिसरा भिडू आल्याने निवडणूक रंजक ठरणार आहे. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्वसामान्य शिक्षक प्रतिनिधी म्हणून ही निवडणूक लढविणार व जिंकणार असा निर्धार प्रा. दत्तात्रय पानसरे यांनी केला आहे.

या अगोदर विधानसपरिषदेसाठी नगर जिल्ह्यातून विवेक कोल्हे, भाऊसाहेब कचरे, राजेंद्र विखे हेही इच्छुक असून प्रत्येकाने निवडणूक प्रचार सुरु केला आहे. आता पानसरे यांच्या एंन्ट्रीने विधानपरिषद निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

अकल्पित नेतृत्वगुण, उत्तम प्रतीचे संगठन कौशल्य, धडाडीने काम करण्याची वृत्ती या गुणांमुळे कुठलाही राजकीय वारसा नसताना एक सामान्य शिक्षक ते पंचायत समिती सदस्य, जि. प. सदस्य, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक संचालक, महाराष्ट्र राज्य पणन महामंडळ मुंबईचे विद्यमान अध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांना काम करण्याची संधी मिळालेली आहे.

अनेकविविध प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नाशिक विभागातील अनेक शिक्षक बंधू आणि भगिनींच्या आग्रहाखातर आपण ही विधानपरिषदेची निवडणूक लढवत असल्याचे दत्तात्रय पानसरे यांनी जाहीर केले आहे.

दत्ता पानसरे यांनी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून नगर तसेच पुणे जिल्ह्यात दांडगा संपर्क निर्माण केलाय. महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाचे अध्यक्षपद सध्या पानसरे यांच्याकडे आहे. त्यामुळे आता त्यांच्या विधानपरिषदेच्या रिंगणात झालेल्या ‘एन्ट्री’ने विवेक कोल्हे यांसह अनेक दिग्गजांची डोकेदुखी वाढणार असल्याचे चित्र आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe