अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- मोदी सरकारने नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विधेयक मंजूर केले. परंतु हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
तसेच कामगारांच्या विधेयकावरूनही गदारोळ उठला आहे. या विरोधामध्ये काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यभर मोहीम उघडण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशावरून नगरमध्ये शहरातील कामगारांच्या सह्यांच्या मोहिमेचा प्रारंभ आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोमवारी होणार असल्याची माहिती शहर काँग्रेसने दिली आहे.
कामगारविरोधी कायद्यांमुळे कामगारांवर कुर्हाड कोसळली आहे. कामगार वर्गामध्ये या धोरणाबाबत नकारात्मक भावना आहे.
त्यामुळे नगर शहरातील कामगारांचा आवाज बनत शहर जिल्हा काँग्रेस कामगारांच्या सह्यांचे निवेदन गोळा करून ते प्रदेश काँग्रेसच्या माध्यमातून केंद्र सरकारला पाठवणार आहे.
दरम्यान, ‘केंद्र सरकारनं मांडलेलं कामगार सुधारणा श्रमसंहिता विधेयक राज्यसभेत मंजूर झालं आहे. हा कायदा लवकरच देशभरात लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
ते अतिशय चुकीचे व सर्वसामान्य कामगारांच्याविरोधात आहे असा आरोप कामगारांमधून केला जात आहे. त्यामुळे याच्या विरोधात अनेक आंदोलने झाली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved