नवीन कामगार कायद्याचा श्रीरामपुरात निषेध

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :-   ‘केंद्र सरकारनं मांडलेलं कामगार सुधारणा श्रमसंहिता विधेयक राज्यसभेत मंजूर झालं आहे. हा कायदा लवकरच देशभरात लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

ते अतिशय चुकीचे व सर्वसामान्य कामगारांच्याविरोधात आहे असा आरोप कामगारांमधून केला जात आहे. त्यामुळे याच्या विरोधात अनेक आंदोलने झाली. मात्र, केंद्र सरकारनं हा निर्णय मागे घेतला नाही.

कामगार कायदा अंमलात आणण्यासाठी कुठल्याही कामगार संघटनेबरोबर बैठक न लावता व विचारात न घेता हे कामगार विरोधी धोरण सरकारने लादले आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय उद्योजकांच्या फायद्याचा व कामगारांच्या तोट्याचा आहे.

त्यामुळे सनफ्रेश अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज कामगार संघटनेच्यावतीने या नवीन कायद्याचा निषेध करून महसूल अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब पोटे,

सचिव अजित गिरमे, कोषाध्यक्ष सचिन गिरमे आदी उपस्थित होते. दरम्यान, नुकतेच राज्य सरकारनं पुढाकार घेऊन किमान महाराष्ट्रात तरी हा कायदा लागू करू नये,

अशी विनंती करणारं पत्र एका अहमदनगरच्या कामगारानं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं होत. तुषार बाळासाहेब सोनवणे असे या कामगाराचे नाव असून ते नगरच्या औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीत काम करतात.

हा कायदा जर महाराष्ट्रात लागू झाला तर कारखाना व्यवस्थापक कारखाना मालक हे कामगारांना अक्षरश: आपले गुलाम बनून राबवून घेतील, कामगारांची मुस्कटदाबी होईल,

तसेच कामगारांना आपले हक्क अधिकार मागता येणार नाहीत. आज कामगार संघटित होऊन आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करीत आहे

त्याला पुढील काळात संघटित होता येणार नाही.केंद्र सरकारने कायदा अमलात आणला, लागू केला तर आपण हा कायदा महाराष्ट्रात लागू करू नये.’

जर जनतेला आपण असे आश्वासन दिले तरपुढील काळात सर्वसामान्य गोरगरीब कामगार हा नक्कीच आपल्या बाजूने उभा राहील. असे त्यांनी या पत्रामध्ये म्हटले होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment