Ahmednagar News : १५ वर्षाच्या विद्यार्थिनीवर अत्याचार, आधी तिला इमामपूर घाटात नेले.. त्यानंतर..

Ajay Patil
Published:
Crime News

Ahmednagar News : नगर शहरात राहणाऱ्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत फूस लावून छत्रपती संभाजी नगर रोडवरील इमामपूर घाटातील लॉजवर नेवून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना बुधवारी (दि.२९) दुपारी घडली.

याबाबत पिडीत मुलीने रात्री उशिरा एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादी वरून पोलिसांनी आरोपी आदिनाथ लोंढे (रा. भराट गल्ली जवळ एका होस्टेल मध्ये) याच्या विरुद्ध अत्याचारासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर पिडीत मुलीची आरोपीसोबत ओळख झाली होती. त्याने तिला फिरायला जावू असे म्हणत त्याच्या बुलेट गाडीवर इमामपूर घाटात नेले व तेथे एका लॉजवर नेवून लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केला.

ही बाब तिने कुटुंबियांना सांगितल्यावर तिच्या कुटुंबीयांनी तिला पोलिस ठाण्यात नेले. तेथे तिने याबाबत फिर्याद दिली. अहमदनगर जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असल्याचे चित्र आहे. अत्याचारासह, विनयभंग, छेडछाड आदी घटना देखील जिल्ह्यात अनेकदा घडल्या आहेत.

नुकतेच दोन दिवसांपूर्वी नगर शहरातील बाजारपेठेत पाणीपुरी खायला गेलेल्या मुलीची छेड काढण्याचा प्रकार झाला होता. मुलीचे मामा तेथे आल्यानंतर त्यांनी तेथून काढता पाय घेतला. सहा महिन्यापूर्वी नगर शहरातील काही मुली फिरायला म्हणून गेल्यानंतर गायब झाल्या होत्या. त्या थेट दुसऱ्या जिल्ह्यात सापडल्या होत्या.

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार झाल्याच्या अनेक घटनांचे गुन्हे पोलिसांत दाखल आहेत. त्यामुळे अशा घटना घडू नयेत यासाठी पोलिसांनी चोख कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe