चिंताजनक : राज्यातील तब्बल ‘इतक्या’ पोलिसांचा कोरोनामुळे झालाय मृत्यु !

Published on -

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- कोरोना संकटात सहा महिन्यांहून अधिक काळ अविरत सेवा बजावणाऱ्या पोलीस दलास कोरोनाचा सार्वधिक विळखा बसला आहे.

आत्तापर्यंत २३,८७९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून २५० पोलिसांचा मृत्यू झाला आहे. संसर्ग होण्याचा वेग कमी झाला असला तरी मृत्यू थांबत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे.

संसर्ग टाळण्यासाठी लावलेल्या लॉकडाउनमध्ये कारवाईदरम्यान पोलिसांचा थेट संपर्क नागरिकांशी आला. याचा फटका पोलीस दलास बसून अद्याप २,७५८ पोलीस उपचार घेत आहेत.

काही दिवसांत दर दिवशी २००च्या वर पोलिसांना या विषाणूची बाधा होत असल्याचे समोर आले. काही दिवसांत संसर्गाचा वेग काही प्रमाणात मंदावला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News