एकही ऊसतोड मजूर कारखान्यावर जाणार नाही माजी मंत्री धस यांचा इशारा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :-  या वर्षीच्या गळीत हंगामासाठी एकही ऊसतोड मजूर व मुकादम कारखान्यावर जाऊ दिला जाणार नाही.

तसेच त्यांच्या न्याय मागण्या व कायदा केल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे प्रतिपादन माजी मंत्री विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी खर्डा येथे ऊसतोड मजूर व मुकादम संघटना यांच्या संयुक्त चर्चासत्राच्या कार्यक्रमात केले.

ते बोलताना पुढे म्हणाले की साखर कारखाने अल्पदराने कमिशन देऊन ऊसतोड कामगारांची व मुकादमाचे पिळवणूक करीत आहेत.

या वर्षीपासून ऊसतोड मजुरांना १५०% मुकादम ३८ % व वाहतूकदारांना ५०% दराने भाव वाढून दिला पाहिजे व तसा कायदा करावा. अशी आम्ही मागणी कारखानदार व सरकारकडे केली आहे.

साखर कारखाने मुकादम यांना किती पैसे ऊसतोड मजुरांसाठी देतात व तर प्रत्यक्षात मुकादम हे ऊसतोड मजुरांना किती पैसे देतात यामध्ये मोठी तफावत आहे. साखर सम्राटांच्या जिल्हा सहकारी बँकेने मुकादमांना  कर्ज वाटप करावे अशी मागणी आ,सुरेश धस यांनी केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment