उद्योग व्यवसायांना उभारी आणि प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर योजना राबवल्या जात असून या योजनांचा लाभ घेऊन नवीन उद्योग उभारणीसाठी चालना मिळताना आपल्याला दिसून येत आहे. असे जे उद्योग अस्तित्वात आहे त्यांचा विस्तार आणि विकास करण्यासाठी देखील अशा योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जातो.
या दृष्टिकोनातून जर आपण कृषी क्षेत्राचा विचार केला तर यामध्ये अशा प्रक्रिया उद्योगांना देखील खूप महत्त्व असून अशा प्रकारचे उद्योग उभारणीसाठी केंद्र सरकारच्या योजनांपैकी पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना देखील खूप महत्त्वाचे आहेत.या योजनेच्या माध्यमातून कृषी प्रक्रिया उद्योग उभारणी करीता एकूण प्रकल्पाच्या 35 टक्के आणि जास्तीत जास्त तीन कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते.
कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी महत्त्वाची आहे पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
कृषी प्रक्रिया उद्योजक उभारण्यासाठी पंतप्रधान सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना ही कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येते व या योजनेच्या माध्यमातून एकूण प्रकल्पाच्या 35 टक्के व जास्तीत जास्त तीन कोटी रुपयांचे अनुदान या माध्यमातून दिले जाते. शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी गट यांना प्राधान्याने यामध्ये फायदा मिळतो.
तसेच अशा प्रकारचे सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांचा विस्तार तसेच स्तर वृद्धीसाठी या योजनेच्या माध्यमातून एक जिल्हा एक उत्पादन यावर आधारित कृषी प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य दिले जाणार आहे.
उद्योगांच्या भांडवली गुंतवणूक तसेच पायाभूत सुविधांची उभारणी, इंक्युबॅशन सेंटर तसेच स्वयंसहायता बचत गटांच्या सदस्यांना बीज भांडवल, मार्केटिंग व ब्रँडिंग इत्यादी करिता या योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येतो.
पंतप्रधान सूक्ष्म प्रक्रिया उद्योग योजनेतून किती मिळते अर्थसहाय्य?
या योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना एकूण प्रकल्प किमतीच्या 35 टक्के किंवा जास्तीत जास्त दहा लाख तर त्यासोबत सामाजिक पायाभूत सुविधा, इनक्युबॅशन केंद्र तसेच मूल्य साखळी घटकांसाठी असलेल्या प्रकल्पांच्या एकूण किमतीच्या 35 टक्के किंवा जास्तीत जास्त तीन कोटी अर्थसहाय्य या माध्यमातून मिळते.
त्यासोबत शेतकरी, बेरोजगार युवक तसेच उद्योजक, महिला भागीदारी संस्था, शेतकरी उत्पादक गट व शेतकरी उत्पादक कंपनी/संस्था, स्वयंसहायता बचत गट, सहकारी, शासकीय संस्थांनी कृषी अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी करीता किंवा त्यांच्या विस्तारीकरणाकरिता व आधुनिकीकरण यासाठी या योजनेच्या माध्यमातून सहभाग नोंदवणे खूप गरजेचे आहे.
व्याजात मिळते तीन टक्के सवलत
आत्मा अंतर्गत नोंदणीकृत असलेले शेतकरी उत्पादक कंपनी तसेच गट व वैयक्तिक शेतकरी यांनी प्रकल्प उभारणी वेळी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेबाबत कृषी पायाभूत योजनेची जर सांगड घातली तर मिळणाऱ्या अनुदानासोबत तीन टक्के व्याजात सवलत देखील मिळते.
अधिक माहितीसाठी या ठिकाणी साधा संपर्क
लाभार्थ्यांना जर अर्ज करायचा असेल तर त्याकरिता कृषी सहाय्यक आणि तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधणे गरजेचे आहे व अधिक माहिती करिता pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती मिळते.