शहर शिवसेनेत फूट पाडण्याचे काम काही पदाधिकारी करत आहेत ]

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- पक्षांतर करून आलेले काका शेळके यांना पक्षाने कोणतेही पद दिले नसताना ते स्वयंघोषित पदाधिकारी म्हणून मिरवत आहेत. स्वतःची वैचारिक पातळी व उंची त्यांनी तपासावी.

चुकीचे पत्रक काढल्यास शिवसेना स्टाईल उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेनेचे मनपाचे माजी गटनेते संजय शेंडगे व नगरसेवक गणेश कवडे यांनी दिला. स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीच्यावेळी शिवसेनेचे सावेडी विभागप्रमुख चंद्रकांत ऊर्फ काका शेळके यांनी जातीयवादाचा आरोप करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते.

त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत अस्वस्थता पुन्हा एकदा समोर आली. काही जातीयवादी शिवसैनिकांनी पक्षाला गळती लावल्याचा आरोपही शेळके यांनी केला होता. या आरोपाला शेंडगे व कवडे यांनी खरमरीत उत्तर दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडणुकीत मराठा समाजाला विरोध दर्शवला,

त्यावर आम्ही आक्षेप घेतला असता त्यांनी आमच्यावर विधानसभेच्यावेळी पक्षविरोधी काम केल्याची टिमकी वाजवण्यास सुरूवात केली. पैशांसाठी फुटणारे तुम्ही व तुमच्या फुटीर साथीदारांनी बालीश बोलणे थांबवावे. अनिल राठोड यांना मागील व आताच्या निवडणुकीत आमच्या प्रभागातून सर्वाधिक मताधिक्य आहे.

हिंमत असेल, तर समोर येऊन पुरावे सादर करा. संपर्कप्रमुख व कवडे यांच्यात काही पदाधिकाऱ्यांनी गैरसमज निर्माण केले होते, पण शहानिशा केल्यानंतर मी माफी मागितली होती, पण ज्यांचा जन्म इतर पक्षात झाला, त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोलाही कवडे व शेंडगे यांनी शेळके यांना लगावला.

शहर शिवसेनेत फूट पाडण्याचे काम काही पदाधिकारी करत आहेत. काका शेळके यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना सेनेने कोणतेही अधिकृत पद दिलेले नाही. पक्षात फूट पाडण्याचा त्यांनी व त्यांच्या साथीदारांनी विडा उचलला असल्याचीही टीका कवडेंनी केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment