महाराष्ट्रातील निवडणुकांचे निकाल ४ जून ला लागले. यामध्ये जातीय समीकरण अनेक ठिकाणी महत्वपूर्ण ठरल्याचे दिसते. महाराष्ट्रात ४८ खासदारांची संख्या आहे. तर यातील तब्बल २६ खासदार हे मराठा समाजाचे निवडून आले आहेत. मराठा आरक्षणाचा गाजलेला मुद्दा येथे महत्वपूर्ण ठरला असल्याचे बोलले जात आहे.
इतर उर्वरित जागांमध्ये नऊ ओबीसी आहेत. अनुसूचित जातींचे सहा खासदार निवडून आले. अनुसूचित जातींचे सहा, तर अनुसूचित जमातींचे चार खासदार आहेत. मराठा समाजाच्या विजयी खासदारांमध्ये महाविकास आघाडीतर्फे २६ पैकी १४ जण निवडून आले. त्यांची टक्केवारी ५४ इतकी आहे. एक अपक्ष आहेत. महायुतीतर्फे ११ मराठा उमेदवार जिंकले. त्यांची टक्केवारी २३ आहे.
अनुसूचित जमातींचे खासदार
१) भास्कर भगरे
२) डॉ. हेमंत सावरा
३)डॉ. नामदेव किरसान
४)गोवाल पाडवी
अनुसूचित जातींचे खासदार
१) बळवंत वानखेडे
२) भाऊसाहेब वाकचौरे
३) प्रणिती शिंदे
४) वर्षा गायकवाड
५) श्यामकुमार बर्वे
६) डॉ. शिवाजी काळगे
मराठा समाजाचे खासदार
१) स्मिता वाघ, २) शाहू छत्रपती ३) डॉ. शोभा बच्छाव ४) नारायण राणे ५) श्रीकांत शिंदे ६) उदयनराजे भोसले ७) नरेश म्हस्के ८) विशाल पाटील ९) सुप्रिया सुळे १०) मुरलीधर मोहोळ ११) श्रीरंग बारणे १२) धैर्यशील मोहिते १३) धैर्यशील माने १४) संजय देशमुख १५) अरविंद सावंत
१६) प्रतापराव जाधव १७) राजाभाऊ वाजे १८) नीलेश लंके १९) ओमप्रकाश राजेनिंबाळकर २०) डॉ. कल्याण काळे २१) संदीपान भुमरे २२) वसंत चव्हाण २३) नागेश आष्टीकर २४) संजय जाधव २५) बजरंग सोनवणे २६) अनुप धोत्रे
ओबीसी खासदार
१) रक्षा खडसे २) प्रतिभा धानोरकर, ३) सुनील तटकरे ४) रवींद्र वायकर ५) डॉ. अमोल कोल्हे ६) डॉ. प्रशांत पडोळे ७) अमर काळे ८) संजय दिना पाटील ९) सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे
खुला प्रवर्ग – १) नितीन गडकरी- ब्राह्मण २) पीयूष गोयल – अग्रवाल ३) अनिल देसाई सारस्वत ब्राह्मण