पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर तसेच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हा खूप महत्त्वाचा असून दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदी कडे आता ग्राहकांचा कल वाढतांना दिसून येत आहे व अनेक वाहन उत्पादक कंपन्या देखील आता इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाकडे वळल्याचे चित्र आहे.
जर आपण कार उत्पादक कंपन्यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर किया या कंपनीने EV3 बाजारामध्ये लॉन्च करण्याची तयारी केली असून साधारणपणे जुलै महिन्यात ग्लोबल लेव्हलवर ही कार लॉन्च केली जाईल अशी शक्यता आहे.
कियाने याआधी EV9, EV6 आणि EV5 नंतर आता कियाच्या माध्यमातून EV3 मॉडेल बाजारामध्ये आणले जाणार असून याने आपल्या इलेक्ट्रिक पोर्टफोलिओ मध्ये आणखी एका मॉडेलची वाढ केलेली आहे. मागील काही दिवसां अगोदर किया कंपनीच्या माध्यमातून अधिकृत टीजर जारी केला होता व तेव्हा जागतिक स्तरावर देखील तो सादर करण्यात आलेला होता.
काय आहेत कीया कंपनीच्या EV3 चे फीचर्स?
कंपनीच्या माध्यमातून या EV3 मध्ये हाय परफॉर्मन्स इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे व ही मोटर 201 बीएचपी पावर आणि 283 Nm पिक टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये इतकी शक्तिशाली पावर देण्यात आली आहे की ती केवळ साडेसात सेकंदामध्ये शून्य ते शंभर किमी प्रति तास वेग वाढवू शकते. एवढेच नाही तर या मॉडेलचा टॉप 180 किमी प्रति तास आहे.
तसेच EV3 जागतिक बाजारपेठेत 58.3kWh आणि 81.4kWh या दोन बॅटरी पॅक पर्यंत लॉन्च केले जाणार असून मोठ्या बॅटरी पॅक पर्यायांसह ते एका चार्जवर सहाशे किमीची रेंज देईल. डीसी फास्ट चार्जर च्या मदतीने तुम्ही 31 मिनिटात दहा ते 80% पर्यंत या कारची बॅटरी चार्ज करू शकतात.
तसेच या कारचे इंटिरियर खूप आलिशान आणि इको फ्रेंडली असून मोठ्या प्रमाणावर इको फ्रेंडली मटरेलचा वापर यामध्ये करण्यात आलेला आहे. या कारचा डॅशबोर्ड वर रिसायकल फॅब्रिकचा वापर करण्यात आला आहे आणि डोअरच्या ट्रिम चा वापर करण्यात आलेला आहे.
तसेच सीट्स, डोअर आरमरेस्ट आणि फ्लॉवर मॅटचा समावेश आहे. यामध्ये 12.3 इंचाचा मोठा डिस्प्ले असणारा असून जो इन्फोटेनमेंट आणि इन्स्ट्रुमेंटेशन साठी जॉईंट सेटअप असणार आहे. तसेच या कारमध्ये हेड अप डिस्प्ले देखील देण्यात आला आहे व हरमन कार्डन साऊंड सिस्टम उपलब्ध असेल.
किया EV3 मध्ये मिळतील हे सेफ्टी फीचर्स
या इलेक्ट्रिक कार मध्ये फॉरवर्ड कॉलिजन अव्हायडन्स, लेन कीप असिस्ट आणि मल्टिपल एअर बॅग अंतर्गत अडॅप्टीव्ह क्रूज कंट्रोल, स्टॅबिलिटी प्रोग्राम आणि लेव्हल दोन ऍडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टम यासारखे फिचर देण्यात आली आहेत.
भारतात कधी होईल लॉन्च?
कोरियन बाजारामध्ये जुलै 2024 पर्यंत ही कार लॉन्च करण्यात येणार आहे व त्यानंतर यूरोप मध्ये लॉन्च केली जाईल. त्यानंतर पुढील वर्षी भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली जाईल अशी शक्यता आहे.
किती राहू शकते या कारची किंमत?
ही कार किया कंपनीची नवीन एन्ट्री लेवल कार असून तिची सुरुवातीची किंमत साधारणपणे तीस लाख रुपये असू शकते.