आंघोळ करण्यासाठी घेतलेल्या पाण्यात तुरटी टाकण्याचे काय मिळतात फायदे? का दिला जातो आंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकण्याचा सल्ला?

Ajay Patil
Published:
bath with alum water

आरोग्याच्या बाबतीत किंवा शरीराच्या चांगल्या आरोग्यासाठी अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींचे खूप महत्त्व असते. चांगल्या आणि सुदृढ आरोग्याकरिता जितका संतुलित आहार व व्यायामासारख्या गोष्टींना महत्त्व असते तितक्याच छोट्या-मोठ्या गोष्टींना किंवा आपल्या दैनंदिन सवयींना देखील असते.

या अशा छोट्या-मोठ्या सवयी जर अंगी बाणवल्या तर आरोग्याला आणि शरीराला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा मिळतो. तसेच आपल्या स्वयंपाक घरातील किंवा घरातील अशा अनेक गोष्टी असतात की त्यांचा वापर आपण काही गोष्टीत केला तर आपल्याला आरोग्य विषयक फायदे मिळतात.

अशाच प्रकारे जर आपण तुरटीचा विचार केला तर आपल्याला सगळ्यांना तुरटी माहिती आहे. अगदी आपल्या शरीराला किंवा बोटाला थोडेसे कापले गेले किंवा दाढी करताना स्क्रॅच झाला तरी देखील आपण त्यावर तुरटी लावतो. तसेच आपण बऱ्याचदा ऐकले असेल की आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवल्याने भरपूर फायदे मिळतात. त्यामुळे या लेखामध्ये आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटी टाकल्याने शरीराला काय फायदे मिळतात याबद्दलचे महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत.

 आंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकल्यामुळे होणारे फायदे

1- त्वचेवरील सुरकुत्या दूर होण्यासाठी तुरटीचा उपयोग पाहिला तर तो केस तसेच त्वचा आणि दातांसाठी देखील खूप फायद्याचा मानला जातो. या अनुषंगाने जर पाहिले तर  आंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुरटी टाकली व त्या पाण्यानेच आंघोळ केली तर चेहऱ्यावरील सुरकुत्या गायब होण्यास मदत होते.तसेच या पाण्यामुळे त्वचेची मालिश केल्याने देखील फायदा मिळतो.

2- सांधेदुखीसाठी फायद्याचे यासंबंधीचे जर आपण बरेच रिपोर्ट पाहिले तर यानुसार तुरटीच्या पाण्याने सांधेदुखी देखील दूर होते व नसा देखील चांगल्या राहतात. जर आंघोळीला कोमट पाणी घेतले व त्यामध्ये तुरटी फिरवली व आंघोळ केली तर सांधेदुखी कमी होते.

3- केसांमधील कोंडा आणि उवा दूर करण्यासाठी तुरटी हा एक महत्वपूर्ण पदार्थ असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एंटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. या गुणधर्मामुळे केस आणि डोक्याची त्वचा आहे यांचे आरोग्य उत्तम राहते.

जर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटी फिरवून किंवा तुरटी टाकून आंघोळ केली तर डोक्याची त्वचा आणि केस स्वच्छ करण्यासाठी मदत होते. केसांमध्ये उवा असतील किंवा कोंड्याची समस्या असेल तर आंघोळीच्या पाण्यात तुरटी फिरवून आंघोळ करावी. त्यामुळे खूप मोठा फायदा मिळतो.

4- युरीन इन्फेक्शन अर्थात संसर्गाचा धोका कमी होतो महिलांना बऱ्याचदा युरिन इन्फेक्शनची समस्या उद्भवते. याकरिता जर महिलांनी दिवसातून दोन वेळा तुरटीच्या पाण्याने प्रायव्हेट पार्ट स्वच्छ केला तर यामुळे देखील खूप मोठा फायदा मिळतो.

5- घाम कमी येतो बऱ्याचदा अंगाला उष्णतेच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर घाम येतो व काही व्यक्तींना तर हिवाळ्यासारख्या थंड ऋतूत देखील घामाची समस्या उद्भवते. परंतु तुम्हाला माहीत नसेल की तुरटी घामाला नियंत्रित करू शकते. ज्यांना जास्त प्रमाणात घाम येण्याची समस्या असते त्यांनी तुरटी फिरवलेल्या पाण्याने आंघोळ केली तर फायदा मिळतो.

6- खोकल्यासाठी फायदेशीर तुरटी मुळे खोकल्याची समस्या दूर होते. पाण्यात तुरटी टाकून जर त्याने गुळण्या केल्या तर घशात होणारी खवखव दूर होते. त्यासोबतच तुरटीची पावडर मधासोबत चाटली तरी खोकल्याची समस्या लगेच दूर होऊन तात्काळ आराम मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe