महत्वाची बातमी! कोपर्डीतील निर्भयाचे आई-वडील मंत्रालयासमोर उपोषण करण्याच्या तयारीत

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणावरून देशभर संतापाची लाट उसळली आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी देशभर निदर्शन करण्यात येत आहे.

याच पार्शवभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील गाजलेलं कोपर्डी प्रकरणातील निर्भयाचे आई -वडील यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.

समजलेल्या माहितीनुसार महिलांवरील अत्याचार व नराधमांविरोधात कोणतेही कठोर शिक्षेची अमंलबजावणी होत नसल्यानं कोपर्डी प्रकरणातील निर्भयाच्या आई वडिलांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

अत्याचार पीडितेच्या दोषींना तात्काळ फाशी दिली जावी, अशी मागणी कोपर्डी निर्भयाच्या माता-पित्याने केली आहे. 2016 मध्ये अहमदनगर जिल्ह्यात कोपर्डी प्रकरण घडले होते.

या प्रकरणातील पीडित कुटुंबाने आपल्या संवेदना हाथरस येथील कुटुंबासाठी प्रकट केल्या आहेत. कोपर्डी प्रकरण सत्र न्यायालयात फास्ट ट्रक कोर्टाने सव्वावर्षात निकाल दिला,

मात्र आता उच्च न्यायालयात अडीच वर्षे उलटूनही प्रकरण प्रलंबित आहे. दोषींच्या फाशीसाठी कोपर्डी निर्भयाचे आईवडील हतबल झाले असून मंत्रालयासमोर आमरण उपोषण करण्याच्या मानसिकतेत आहे.

कोपर्डी असो वा दिल्लीतील निर्भया प्रकरण… हाथरस, बलरामपूर सारख्या घटना समोर येतच आहेत. त्यामुळे आता फास्ट ट्रॅक सारखीच सुनावणी उच्च-सर्वोच्च न्यायालयात होऊन दोषींना तात्काळ फासावर लटकावले जावे असे मागणी कोपर्डी निर्भयाच्या पीडित कुटुंबायानी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment