Business Success Story: एकेकाळी एलआयसी एजंट तर वयाच्या 93 व्या वर्षी अब्जाधीश झाले ‘हे’ उद्योजक! जगात प्रसिद्ध केला सोनालीका ट्रॅक्टर ब्रँड

Published on -

Business Success Story:- जीवनामध्ये जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर त्याकरिता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वयाचा यामध्ये कुठल्याही प्रकारे अडसर येत नाही. फक्त तुमच्या मध्ये कायम उत्साह, उमेद, ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी कष्ट उपसण्याची तयारी, ध्येय किंवा स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत अविरत सातत्याने प्रयत्न करण्याची क्षमता इत्यादी गुण  तुमच्यात असणे गरजेचे असते.

या गुणांचे मिश्रण जर व्यक्तीमध्ये असेल तर ते व्यक्ती कोणत्याही वयामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी होऊ शकते. याच मुद्द्याला धरून आपण या लेखामध्ये अशा एका यशस्वी उद्योजकाबद्दल माहिती घेणार आहोत की त्यांनी त्यांच्या जीवनाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये एलआयसी एजंट म्हणून काम केले व 93 व्या वर्षी ते मोठे उद्योजक व अब्जाधीश म्हणून नावारूपाला आले. अशा या उद्योजकाचे नाव आहे लक्ष्मण दास मित्तल हे होय.

लक्ष्मण दास मित्तल यांची प्रेरणादायी कथा

लक्ष्मण दास मित्तल हे भारताला काही नवीन नाव नाही. त्यांनी मोठ्या कष्टाने सोनालिका ग्रुप उभा केला व त्या माध्यमातून उत्पादित सोनालीका ट्रॅक्टरला जगात नावलौकिक मिळवून दिला. लक्ष्मण दास मित्तल हे सोनालीका ट्रॅक्टरचे संस्थापक आहेत. जर आपण त्यांची जीवनाची सुरुवात पाहिली तर त्यांनी एलआयसी एजंट म्हणून काम करायला सुरुवात केली व यातून आयुष्यभर त्यांना जो पगार मिळाला त्यातून एक एक पैसा वाचवत गेले व निवृत्तीच्या वयामध्ये त्यांनी व्यवसाय करायचे ठरवले.

लक्ष्मण दास मित्तल हे सोनालिका ग्रुप आणि सोनालिका ट्रॅक्टरचे अध्यक्ष आहेत. जर आपण त्यांचे लहानपण पाहिले तर त्यांचा जन्म 5 ऑगस्ट 1931 रोजी पंजाब राज्यातील होशियारपूर या ठिकाणी झाला. त्यांचे वडील हे धान्याचे व्यापारी होते व घराची आर्थिक परिस्थिती मात्र बेताची होती.

तो लक्ष्मणदास मित्तल यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी कायमच प्रोत्साहित केले व शिक्षण घेऊन त्यांनी 1955 मध्ये एलआयसी एजंट म्हणून आयुष्यातील करिअरला सुरुवात केली. परंतु उद्योगी स्वभाव असल्यामुळे त्यांना व्यवसाय करण्याची प्रचंड इच्छा होती. परंतु पैशापुढे कोणाचे चालत नाही ही म्हण त्यांनाही लागू होत होती.

व्यवसायासाठी पुरेसे भांडवल असणे गरजेचे आहे व तेच भांडवल त्यांच्याकडे नव्हते. तसेच घराची जबाबदारी देखील त्यांच्यावर असल्यामुळे एखादा व्यवसाय करण्यासाठी आवश्यक पैसा वाचवणे देखील त्यांना कठीण होते. परंतु या अडचणीच्या कालावधीत देखील त्यांनी इच्छा मरू न देता एलआयसी एजंट म्हणून काम करणे सुरू ठेवले

व यातून मिळणाऱ्या पैशांच्या माध्यमातून काही पैसे वाचवायला सुरुवात केली व याच वाचवलेल्या पैशातून त्यांनी 1962 मध्ये थ्रेशर मशीन बनवायला हाती घेतले. परंतु यामध्ये त्यांना यश न आल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

 अशाप्रकारे केली सोनालीका ट्रॅक्टरची सुरुवात

थ्रेशर मशीनचा प्लॅन फसल्यानंतर मोठ्या प्रमाणावर त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. परंतु तरीदेखील हार न मानता त्यांनी 1996 मध्ये  स्वतः जवळच्या सर्व बचतीचा वापर केला व सोनालीका ट्रॅक्टरची सुरुवात केली. आज सोनालीका ट्रॅक्टर भारतातील हरियाणा आणि उत्तर प्रदेश व पंजाब मधील शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे व इतकेच नाही तर संपूर्ण भारतात सोनालिका ट्रॅक्टरला पसंती दिली जाते.

तसेच लक्ष्मण दास मित्तल यांची कंपनी जगातील 120 पेक्षा जास्त देशांमध्ये सोनालिका ट्रॅक्टरची निर्यात करते. आज सोनालिका ग्रुपच्या पाच देशांमध्ये पाच प्लांट असून लक्ष्मण दास मित्तल हे आज भारतातील दुसरे सर्वात वृद्ध अब्जाधीश आहेत व ‘फोर्ब्स’च्या अब्जाधीशांच्या  यादीमध्ये देखील त्यांचा समावेश होतो व आज त्यांच्या सोनालिका समूहाची एकूण संपत्ती 23 हजार कोटींच्या आसपास पोहोचली आहे.

लक्ष्मण दास मित्तल यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते की जर जबर इच्छाशक्ती व इच्छा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले कष्ट आणि प्रयत्न करण्याची क्षमता जर व्यक्तीमध्ये असेल तर कुठल्याही वयामध्ये व्यक्ती मोठ्या प्रमाणावर यशस्वी होऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!