भारतामध्ये ज्या काही कार उत्पादक कंपन्या आहेत त्यातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी म्हणून मारुती सुझुकी ही कंपनी ओळखली जाते. मारुती सुझुकी कंपनीच्या माध्यमातून अनेक आकर्षक वैशिष्ट्य असलेल्या कार्स बाजारपेठेमध्ये सादर करण्यात आलेल्या आहेत व त्यातील बहुतांश कार मॉडेल हे ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याचे आपल्याला दिसून येते.
जवळपास मारुती सुझुकीच्या सर्वच कारला ग्राहकांमधून चांगला प्रतिसाद मिळताना आपल्याला दिसून येतो. या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स देखील या कंपनीच्या माध्यमातून सादर केल्या जातात. या सगळ्या परिस्थितीत जर आपण या कंपनीचा विचार केला तर मारुती सुझुकीच्या नेक्सा रेंजद्वारे जाकारी विक्री केल्या जाणाऱ्या आहेत
त्यावर आकर्षक डिस्काउंट ऑफर करत आहे. यामध्ये प्रामुख्याने मारुती सुझुकी बलेनो,फ्रॉँक्स, जिम्नी, सियाज, XL6 आणि ग्रँड विटारा यासारख्या कार मॉडेलचा समावेश आहे. या डिस्काउंट ऑफरमध्ये कंपनीकडून सवलत व त्याशिवाय एक्सचेंज बोनस, कार्पोरेट डिस्काउंट आणि इतर फायदे देत आहे.
मारुती सुझुकी या कारवर देत आहे डिस्काउंट ऑफर
1- ग्रँड विटारा– नेक्सा रेंजमध्ये मारुती सुझुकी एसयुव्ही ग्रँड विटारावर सर्वात जास्त डिस्काउंट देत आहे. या डिस्काउंट ऑफरमध्ये ग्राहकांना वीस हजार रुपयांची सूट, 50 हजार रुपयांचा एक्सचेंज ऑफर आणि चार हजार रुपयांची कार्पोरेट डीलचा यामध्ये समावेश आहे. तसेच कंपनीच्या माध्यमातून स्टॅंडर्ड दोन वर्ष वारंटी वाढवून ती पाच वर्षापर्यंत करण्यात आलेली आहे. यामध्ये स्टॅंडर्ड पेट्रोल ग्रॅण्ट विटारा पोर्टफोलिओ 34 हजार रुपयांपासून 64 हजार रुपये पर्यंतच्या सूट सोबतच सीएनजी मॉडेलवर मात्र केवळ चार हजार रुपयांची कार्पोरेट सूट देत आहे.
2- मारुती सुझुकी फ्रॉँक्स– ही मारुती सुझुकी कंपनीचे जे काही कार पोर्टफोलिओ आहे त्यामध्ये सर्वात जास्त विक्री होणारी एसयूव्ही आहे आणि नेक्सा रेंज मधील सर्वात लोकप्रिय देखील आहे. हे कार अशी आहे की जी दोन इंजिनमध्ये सादर केली जाते. कंपनीच्या माध्यमातून टर्बो पेट्रोल फ्रॉँक्सवर 57 हजार रुपयापर्यंत ऑफर देत असून यामध्ये पंधरा हजार रुपयांची सवलत, दहा हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि दोन हजार रुपयापर्यंत कार्पोरेट डीलचा समावेश करण्यात आलेला आहे.
एवढेच नाही तर तीस हजार रुपये वेलोसिटी ॲक्सेसरीज किट सुद्धा या डिस्काउंट सोबत देण्यात येत आहे. तसेच दुसरे म्हणजे नॅचरली एस्पीरेटेड इंजिन असलेल्या कारवर 27 हजार रुपयापर्यंत सवलत मिळत असून या कारच्या सीएनजी मॉडेलवर जवळपास 12 हजार रुपयांची सवलत मिळत आहे.
3- मारुती सुझुकीची जिम्नी– ज्या ग्राहकांना मारुती सुझुकीची जिम्नी खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्या लोकांकरिता आनंदाची बातमी असून या कारवर संपूर्ण जून महिन्यात 50 हजार रुपयांची सवलत ऑफर देण्यात आलेली आहे. सध्या या कारची दिल्ली एक्स शोरूम किंमत 12.74 लाख रुपये पासून ते 14.79 लाख रुपयांपर्यंत आहे.
4- मारुती इग्निस– मारुती सुझुकीच्या माध्यमातून इग्निस एएमटी मॉडेलवर साधारणपणे 58 हजार रुपयांची सवलत देण्यात येत असून यामध्ये चाळीस हजार रुपयांचे सवलत आणि पंधरा हजार रुपयांचा एक्सचेंज डील आणि तीन हजार रुपयांचा कार्पोरेट बोनस समाविष्ट करण्यात आलेला आहे. इग्निस मॅन्युअल रेंजवर 53 हजार रुपयापर्यंत सवलत देण्यात येत आहे.
5- मारुती बलेनो– ही मारुती सुझुकीची सर्वात विक्री होणारी कार असून या कारच्या एएमटी मॉडेलवर 57 हजार रुपयांची सूट मिळत असून यामध्ये 35 हजार रुपयांची सवलत, पंधरा हजार रुपयांचा एक्सचेंज ऑफर आणि दोन हजार रुपयांचा कार्पोरेट डीलचा यामध्ये समावेश आहे. या हॅचबॅक ची किंमत आठ लाख 38 हजार रुपये इतकी आहे.
6- मारुती सियाज– मारुती सुझुकीची सियाज ही सर्वाधिक महाग कार असून नेक्सा सियाजच्या या सर्व व्हेरियंटवर 48 हजार रुपयापर्यंत सवलत आहे व यामध्ये 20 हजार रुपयांची सवलत, 25 हजार रुपयांचा एक्सचेंज डील आणि तीन हजार रुपयांची कार्पोरेट सवलत मिळत आहे. या कारची दिल्ली एक्स शोरूम किंमत नऊ लाख 40 हजार रुपये ते 12.29 लाख रुपये पर्यंत आहे.
7- मारुती सुझुकी XL6- मारुती सुझुकी XL6 वर 29 हजार रुपयांची सवलत मिळत असून यामध्ये पेट्रोल व्हेरियंटवर एक डील मिळते व त्यामध्ये वीस हजार रुपयांचा एक्सचेंज डील आणि दहा हजार रुपयांची सवलत आहे. तसेच XL6 सीएनजी वर दहा हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळू शकते. या कारची किंमत 11.61 लाख रुपये पासून 14 लाख 61 हजार रुपयांपर्यंत आहे.