Gold-Silver Price Today:- गेल्या काही दिवसापासून सातत्याने उच्चांकी पातळीवर असलेले सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसापासून सातत्याने चढ उतार होताना दिसून येत आहेत.कधीकधी हे चढ उतार मोठ्या प्रमाणावर होते तर कधी किंचितशी वाढ पाहायला मिळते. म्हणजेच एकंदरीत सध्या सोन्या-चांदीच्या दारात स्थिरता पाहायला मिळत नाहीये.
कधी कधी सोन्याच्या दारात वाढ पाहिला मिळते तर कधी कधी घसरण होते. याच पद्धतीने जर आपण आज बुधवारचा विचार केला तर सोन्याच्या दरामध्ये किंचितशी वाढ पाहायला मिळत आहे. अगोदरच उच्चांकी पातळीवर पोहोचलेले सोने अशा पद्धतीने जर वाढत राहिले तर त्याचा मोठा फटका सोने खरेदीदारांना बसताना दिसून येत आहे.
या अनुषंगाने जर तुम्हाला देखील सोने खरेदी करायची असेल तर आजचे बाजार भाव जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरेल.
काय आहेत सोन्या चांदीचे आजचे दर?
आज बुधवारी सोन्याच्या दरामध्ये अल्पशी वाढ दिसून येत असून आज जवळपास 24 कॅरेट सोन्याची किंमत ७१६०० रुपये असून मागील ट्रेडमध्ये ही किंमत 71 हजार 250 रुपये प्रति दहा ग्राम इतके होते. जर आपण आयबीजेए अर्थात बुलियन मार्केटची वेबसाईट पाहिली तर त्यानुसार चांदीचे दर देखील ८८९९० रुपये प्रतिकिलो दराने आहेत.
मागील ट्रेडमध्ये चांदीची एका किलो ची किंमत 89 हजार 50 रुपये होती व यावरून आपल्याला दिसून येते की चांदीच्या दरात आज वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
बुलियन मार्केटच्या वेबसाईट नुसार राज्यातील प्रमुख शहरातील सोन्याचे बाजारभाव
1- पुणे शहर– पुण्याला आज 22 कॅरेट सोन्याचे दर हे 65 हजार 514 प्रति 10 ग्राम इतके असून 24 कॅरेट सोन्याचे दर 74 हजार 470 रुपये प्रति दहा ग्राम इतके आहेत.
2- मुंबई शहर– मुंबई या ठिकाणी आज 22 कॅरेट सोन्याचे दर 65 हजार 514 रुपये प्रति दहा ग्राम असून 24 कॅरेट सोन्याचे दर हे 71470 रुपये प्रति दहा ग्राम इतके आहे.
3- नाशिक शहर– नाशिक या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचे दर 65 हजार 514 रुपये प्रति दहा ग्राम असून 24 कॅरेट सोन्याचे दर 71,470 रुपये प्रति दहा ग्राम इतके आहेत.
4- नागपूर शहर– नागपूर या ठिकाणी 22 कॅरेट सोन्याचे दर 65 हजार पाचशे चौदा रुपये प्रति दहा ग्राम असून 24 कॅरेट सोन्याचे दर 71,470 रुपये प्रति दहा ग्राम इतके आहेत.
( टीप– उत्पादन शुल्क तसेच राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमतींमध्ये भारतभर बदल होत असतात. तसेच वर उल्लेख केलेले सोन्याचे दर हे सुचक असून यामध्ये जीएसटी तसेच इतर महत्त्वाच्या करांचा समावेश केलेला नाही.)