भारतामध्ये स्कूटरचे निर्मिती अनेक प्रसिद्ध अशा कंपन्यांच्या माध्यमातून केली जाते व यामध्ये प्रामुख्याने आपण होंडा तसेच सुझुकी, बजाज आणि हिरो सारख्या कंपन्यांचे नाव अग्रक्रमाने घेतो. या कंपन्यांच्या माध्यमातून अनेक आकर्षक वैशिष्ट्य असलेल्या स्कूटर बाजारपेठेत लॉन्च करण्यात आलेल्या आहेत
व या सोबतच यामाहा मोटर्स इंडिया ही कंपनी देखील स्कूटर्स निर्मितीमध्ये आघाडीवर असून नुकतीच या कंपनीच्या माध्यमातून यामाहा Facino S स्कूटर लॉन्च करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे यामाहा कंपनीच्या या आधीच्या मॉडेल पेक्षा ही लाँच करण्यात आलेली स्कूटर अनेक ॲडव्हान्स फीचर्सने परिपूर्ण अशी आहे.

यामाहाने लॉन्च केली Yamaha Facino S स्कूटर
यामाहा मोटर इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून यामाहा फॅसिनो एस स्कूटर लॉन्च करण्यात आलेली असून ही स्कूटर कंपनीच्या आधीच्या मॉडेल पेक्षा खूपच ऍडव्हान्स फीचरने समृद्ध आहे. तसेच ही स्कूटर तीन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आलेली असून तीनही स्कूटर ची किंमत वेगवेगळी आहे.
कंपनीने या स्कूटरमध्ये 125cc एअर कुल्ड इंजिन वापरले असून हे इंजिन ८.०४ बीएचपी पावर आणि 10.3 एनएम टॉर्क जनरेट करते. या स्कूटरमध्ये 5.2 लिटरची इंधनाची टाकी देण्यात आली असून पुढच्या बाजूला 12 इंचाचे अलॉय व्हील आणि मागच्या बाजूला दहा इंचाचे अलॉय व्हील देण्यात आलेले आहेत.
तसेच या स्कूटरच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क आणि मागच्या बाजूला मोनोशॉक सस्पेन्शन दिले आहे. तसेच पुढील चाकामध्ये डिस्क ब्रेक तर मागच्या चाकामध्ये ड्रम ब्रेक दिलेला आहे.
या स्कूटरमध्ये दिले आहे आंसर बॅक नावाचे फंक्शन
यामाहा फॅसिनो एस या स्कूटरमध्ये कंपनीने एक विशेष आंसर बॅक नावाचे फंक्शन दिले आहे व या फंक्शनच्या मदतीने तुम्हाला कुठूनही ही स्कूटर शोधता येणे शक्य आहे. याकरिता फक्त तुम्हाला यामाहा स्कूटर आंसर बॅक हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करणे गरजेचे आहे.
किती आहे यामाहा फॅसिनो एस स्कूटरची किंमत?
यामाहा कंपनीने लॉन्च केलेल्या या स्कूटरची सुरुवातीची किंमत 93730 असून या किमतीत इतर व्हेरियंट प्रमाणे बदल होऊ शकतो.













