अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या आणखी एका नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. हे प्रकरण पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील आहे.
इथे रविवारी रात्री काही अज्ञात इसमांनी भाजप नेते मनीष शुक्ला यांची गोळ्या झाडून हत्या केली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही घटना टीटागड पोलीस ठाण्याच्या अगदी समोर घडली आहे.
यावरुन आपण अंदाज बांधू शकता की, हे आरोपी किती निर्भयपणे हे कृत्य करत होते. दरम्यान, या घटनेनंतर येथील परिस्थिती तणावपूर्ण बनली असून, त्या दृष्टीने येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मनीष शुक्ला यांच्या हत्येनंतर भाजपा नेत्यांनी बॅरेकपूरमध्ये बंदचे आवाहन केले असून राज्यपालांनीही याची गंभीर दखल घेतली आहे.
याप्रकरणी, राज्यपाल जयदीप धनखड यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक आणि इतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना राजभवन येथे बोलावले आहे.
मनीष शुक्ला हे रविवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास टीटागढ पोलीस ठाण्यासमोरील आपल्या भाजपा कार्यालयात बसले होते. त्याचदरम्यान, येथे दुचाकीवर आलेल्या अज्ञांतांनी शुक्ला यांच्या गोळीबार केला.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शुक्ला यांना तात्काळ बॅरेकपूरच्या बी.एन. हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यंत खालवल्याने त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र,
येथील डॉक्टर्संने मनीष शुक्ला यांना मृत घोषित केले. या हल्ल्यात मनीष यांचा मृत्यू झाला असून आणखी एक गंभीर जखमी आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved