केंद्र सरकार बांधणार 3 कोटी घरे! तुम्ही कसा घ्याल पीएम आवास योजनेचा लाभ? कसा कराल अर्ज?

Ajay Patil
Published:
pm awaas yojana

देशातील नागरिकांना स्वतःचे हक्काचे पक्के घर मिळावे याकरिता पंतप्रधान आवास योजना राबवली जाते व या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. या योजनेसोबतच महाराष्ट्र सरकारच्या देखील अनेक आवास योजना आहेत व यामध्ये प्रामुख्याने राज्यातील नागरिकांना पक्के घर उपलब्ध करून दिले जाते व असे घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते.

नुकतेच देशांमध्ये नरेंद्र मोदी  यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन झाले व पंतप्रधान पदाची शपथ त्यांनी घेतली. प्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंडळाच्या झालेल्या पहिल्याच बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला व या अंतर्गत  संपूर्ण देशामध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आणखी तीन कोटी घरे बांधण्यावर एकमत झाले.

त्यामुळे आता येणाऱ्या काही वर्षात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आणखीन तीन कोटी घरे बांधण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे आता या योजनेअंतर्गत जी घरे बांधले जातील त्यामध्ये शौचालयापासून वीज, एलपीजी गॅस कनेक्शन तसेच नळ जोडणी अशा सुविधा देखील दिल्या जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचे पक्के घर बांधायचे असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यावा? याची महत्त्वपूर्ण माहिती या लेखात आपण घेऊ.

कसे आहे पीएम आवास योजनेचे स्वरूप?

पंतप्रधान आवास योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना असून या माध्यमातून लोकांना घर बांधून दिले जाते व त्यांना कमाल दोन लाख 50 हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत केली जाते. देशातील गरिबांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे व त्यांना राहण्यासाठी पक्के घर मिळावे दृष्टिकोनातून ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

आता या योजनेचा विस्तार करण्यात आला असून या माध्यमातून गरिबांपासून ते मध्यमवर्गापर्यंत नागरिकांना हक्काचे घर उभारणे शक्य झालेले आहे. या योजनेतून निधी मिळतो व हा निधीचा लाभ मिळावा याकरिता उत्पन्नाच्या आधारावर या योजनेत अनेक गट पाडण्यात आलेले आहेत.

या वेगवेगळ्या गटांनुसार घरासाठी कर्ज दिले जाते. अगोदर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम तीन ते सहा लाख रुपये होती व या कर्जावर अनुदान देखील मिळायचे. परंतु आता या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या कर्जाची मर्यादा 18 लाख रुपये पर्यंत वाढवण्यात आली आहे.

 पंतप्रधान आवास योजनेसाठी कसा करावा अर्ज?

1- याकरिता सगळ्यात आधी https://pmaymis.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.

2- त्या ठिकाणी मुख्य मेनू मध्ये जाऊन सिटीजन असेसमेंट या पर्यायावर क्लिक करावे आणि अर्जदार या पर्यायाला सिलेक्ट करावे.

3- त्यानंतर या ठिकाणी एक नवी विंडो ओपन होते व त्या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकावा.

4- पुढे सगळे वैयक्तिक माहिती तसेच बँक खात्या संदर्भातील माहिती व सध्याच्या घराचा पत्ता इत्यादी माहिती भरावी.

5- हे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा कॅपच्या कोड टाकावा आणि पूर्ण माहिती व्हेरिफाय करून अर्ज सबमिट करावा.

 कोणकोणती कागदपत्रे लागतील?

पंतप्रधान आवास योजनेकरिता जर अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच मतदान कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे असणे गरजेचे आहे. याशिवाय तुमच्याकडे उत्पन्नाचे प्रमाणपत्र असावे. तसेच यामध्ये फॉर्म क्रमांक 16, बँक खात्याचे स्टेटमेंट, आयटी रिटर्न्स असणे गरजेचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe