नेवासा – चांगल्या पावसाच्या भरवशावर नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या खरीप पेरण्या पाटपाणी वेळेवर उपलब्ध न झाल्याने वाया गेल्या.त्याचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे प्रमुख माजी आमदार शंकरराव गडाख यांनी केली आहे.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनात गडाख यांनी म्हटले आहे, की चांगल्या पावसाच्या भरवशावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजरी, सोयाबीन, कपाशी आदी खरीप पिकांची पेरणी केली. मुळा व भंडारदरा ही दोन्ही धरणे ओव्हरफ्लो झाल्याने पाटपाणी मिळून पिके जगण्याची आशा होती.

त्याचवेळी तालुक्यात पाऊसच झाला नाही. शेतकऱ्यांच्या मागणीवरून दोन्हीही धरणांतून एक महिन्यापूर्वी आवर्तन सोडण्यात आले. यातून श्रीरामपूर, राहुरी, शेवगाव, पाथर्डी तालुक्यांतील साठवण बंधारे व तलाव भरून शेतीलाही मुबलक पाणी देण्यात आले; मात्र या दोन्ही धरणांच्या आवर्तनातून नेवासा तालुका अद्यापही वंचित आहे.
त्यामुळे पिके जळून गेली आहेत. ‘टेल टू हेड’ हा नियम अत्यंत तकलादू आणि नेवासा तालुक्याची क्रूर चेष्टा करणारा ठरला आहे. ‘मुळा’ व ‘भंडारदरा’च्या आवर्तनांना वेगवेगळा न्याय दिला जात आहे. आवर्तन काळात मुळा धरण्याच्या हेडला असलेल्या राहुरी तालुक्यातील बंधारे, तलाव भरून शेतीलाही पाणी देण्याचा प्रकार होत आहे.
शेतकऱ्याच्या कर्जाचा डोंगर वाढला आहे. त्यांना आधार देण्याची जबाबदारी शासनाची असून पिकांचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
- गुजरातएवढा बर्फाचा तुकडा फुटण्याच्या मार्गावर?, मुंबईसह जगभरातील शहरांना जलप्रलयाचा धोका! वैज्ञानिकांचा खळबळजनक इशारा
- ‘या’ 5 राशींवर असते श्री गणेशाची विशेष कृपा, मिळते अपार संपत्ती आणि यश!
- महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ‘इतक्या’ वर्षांनी वाढणार ? समोर आली मोठी अपडेट
- रोहित शर्मा-विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी महत्वाची बातमी! 2027 च्या वर्ल्ड कपपूर्वीच…
- 2025 मध्ये युद्ध तर 2033 मध्ये…, बाबा वेंगांची हादरून टाकणारी भविष्यवाणी!