Ahmednagar News : कृषी विभागातर्फे खरीप हंगाम पूर्व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन

Pragati
Published:
KRUSHI

Ahmednagar News : बुरूडगाव येथे तालुका कृषी अधिकारी, अहमदनगर यांच्या वतीने खरीप हंगाम पूर्व तयारी, बियाणे उगवण क्षमता, तपासणी बियाणे बीज प्रक्रिया, माती नमुना काढणे, हुमणी कीड व्यवस्थापन असे विविध प्रात्यक्षिक घेण्यात आले. तसेच सोयाबीन बियाणे परमिट वाटप केले.

तालुका कृषी अधिकारी सिद्धार्थ शिरसागर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बियाणे उगवण क्षमता तपासणी, बीज प्रक्रिया करणे, पिकाची पेरणी पद्धत याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. त्याचप्रमाणे मंडळ कृषी अधिकारी ए आर वाळके यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी माती परीक्षणानुसार खताचा वापर बियाणे उगवण क्षमता,

बीज प्रक्रिया, एकात्मिक कीड – रोग व्यवस्थापन, महाडीबीटी पोर्टल वरील कृषी विभागाच्या ऑनलाईन योजना यांची माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक प्रतिभा राऊळ व कृषी सहाय्यक मंदा भारती यांनी उपस्थित शेतकऱ्यांना माती नमुना काढणे, हुमणी कीड व्यवस्थापन, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया युनिट,म ग्रा रो ह यो फळबाग लागवड, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड,

CRA पद्धतीने फळबाग लागवड करणे, निंबोळी अर्क तयार करणे, दशपर्णी अर्क तयार करणे या बद्दल माहिती दिली .सोयाबीन बियाणे परमिट वाटप केले. यावेळी बुरूडगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe