पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आणला हरभऱ्याचा जास्त उत्पादन देणारा वाण! हेक्टरी देईल 20 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन

Published on -

रब्बी हंगामामध्ये जर प्रमुख पिकांचा विचार केला तर यामध्ये हरभरा हे प्रमुख पीक असून महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये हरभऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. हरभरा लागवडीसाठी शेतकरी अनेक नवनवीन वाणाचा वापर करतात व अशा व्हरायटी विकसित करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक कृषी विद्यापीठांचा मोलाचा सहभाग असल्याचे आपल्याला दिसून येते.

तसे पाहायला गेले तर हरभराच नाही तर असे अनेक पिकं आहेत ज्यांचे  दर्जेदार आणि चांगले उत्पादनक्षम देण्यास सक्षम अशा व्हरायटीच्या विकासासाठी कृषी विद्यापीठे मोलाची भूमिका बजावतात. अगदी याचप्रमाणे जर आपण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा विचार केला तर गेले तीन दिवस चाललेल्या जॉईंट ॲग्रेस्को मध्ये या विद्यापीठाचे विविध पिकांचे वाण तसेच यंत्रे, तंत्रज्ञान इत्यादी शिफारसी मोठ्या प्रमाणात मंजूर करण्यात आलेले आहेत.

यामध्ये जर आपण हरभऱ्याच्या व्हरायटीचा विचार केला तर  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी आणला असून या वाणाचे नाव सुपर जॅकी( एकेजी 1402) असून हा वाण हेक्‍टरी 20.73 क्विंटल पर्यंत उत्पादकता देऊ शकेल व 95 दिवसात काढण्यासाठी तयार होऊ शकणारा वाण आहे.

 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आणला हरभऱ्याचा नवीन वाण

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञांनी हरभऱ्याचा एक नवीन वाण आणला असून त्याचे नाव सुपर जॅकी( एकेजी 1402) असून हा वाण हेक्‍टरी 20.73 क्विंटल पर्यंत उत्पादकता देऊ शकेल व 95 दिवसात पीक काढणीस तयार होऊ शकणार आहे.

म्हणजेच लागवडीनंतर साधारणपणे 95 दिवसात काढणीस येणारा हा वाण असून याचे दाणे जाड असतात. तसेच यंत्राच्या साह्याने काढण्यास हा सोपा आहे व मर रोगाला प्रतिरोधक ते मध्यम प्रतिरोधक वाण आहे. करपा रोगास मध्यम प्रतिकारक आहे.

 धानाचा आणला नवीन वाण

हरभऱ्या सोबतच या विद्यापीठाच्या माध्यमातून धान या पिकासाठी पीडीकेव्ही साक्षी हा वाण विकसित करण्यात आला असून याची उत्पादन क्षमता हेक्टरी 44 क्विंटल इतकी आहे व हा काढणीस 120 दिवसात तयार होतो. या वाणाचे दाणे लांब बारीक तसेच खाण्यास उत्तम असून उंचीने ठेंगणा व न लोळणारा असा वाण आहे.

 मोहरी पिकासाठी आणला पीडीकेव्ही कार्तिक

तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून मोहरी पिकासाठी पीडीकेव्ही कार्तिक हा वाण विकसित करण्यात आला असून याची उत्पादनक्षमता हेक्टरी 15 क्विंटल इतकी आहे. या वाणामध्ये तेलाचे प्रमाण 40.32% असून शेंगामध्ये बियांची संख्या जास्त असते. तसेच मावा आणि भुरी रोगाला इतर वाणापेक्षा तुलनात्मक दृष्ट्या चांगला स्पर्धाक्षम आहे.

याशिवाय करडई आणि कुटकी सारख्या पिकांचे वाण देखील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून विकसित करण्यात आले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe