अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- जामखेड येथील उत्तम पवार यांनी कार्यकर्त्यांसाहित गुरुकुल मंडळात प्रवेश केला. त्यांच्या स्वागतानिमित्त झालेल्या कार्यक्रमात सांस्कृतिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष संजय कळमकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी त्यांनी काही गोष्टींवर प्रकाश टाकला. यावेळी बोलताना ते म्हणाले ‘जिल्ह्यात काही तालुक्यांत शैक्षणिक पात्रता नसताना ठराविक शिक्षकांना केंद्रप्रमुखांचे अधिकार देण्यात आले आहेत.
किमान बीएड पात्रता अपेक्षित असताना डीएड असलेले शिक्षक केंद्रप्रमुखांचे अधिकार वापरून केंद्रातील शिक्षकांना दबावात ठेवत आहेत.
प्रशासनाचे या बाबीकडे दुर्लक्ष झाल्याने शिक्षकांच्या शैक्षणिक कामावर विपरीत परिणाम होत आहे’ असा घणाघातही त्यांनी केला. काही तालुक्यांत त्यांचे अधिकार विस्तार अधिकारी किंवा शेजारील केंद्रातील केंद्रप्रमुखांकडे दिले आहेत.
परंतु काही ठिकाणी केंद्रात उच्चशिक्षित शिक्षक असूनही कमी शैक्षणिक पात्रता असणार्या शिक्षकांकडे प्रभारीपदे देण्यात आली आहेत.
कनिष्ठ शैक्षणिक पात्रता असलेले शिक्षक हे मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकांचे गोपनीय अहवाल कसे भरू शकतात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी उत्तम पवार, विनोद सोनवणे, सुशील पौळ, जितेंद्र आढाव, राजेंद्र साठे, जालिंदर यादव यांनी कार्यकर्त्यांसहित गुरुकुलमध्ये जाहीर प्रवेश केला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved