Farmer Success Story: तीन गिर गाई घेऊन दोन मित्रांनी सुरू केला दूध व्यवसाय! आज दूध विकून महिन्याला कमवत आहेत 5 ते 6 लाख

Ajay Patil
Published:

Farmer Success Story:- कुठल्याही व्यवसायाची सुरुवात करताना ती अगदी मोठ्या प्रमाणात करणे असा काही लिखित नियम नाही. तुम्ही अगदी छोट्याशा स्वरूपामध्ये व्यवसायाची सुरुवात केली व त्यामध्ये प्रयत्न, कामामध्ये सातत्य आणि योग्य नियोजन ठेवले तर टप्प्याटप्प्याने त्या व्यवसायात वाढ होते व कालांतराने तो व्यवसाय यशाला गवसणी घालतो.

ही गोष्ट अगदी छोट्या स्वरूपामध्ये सुरू केल्यानंतर ती हळूहळू वाढवत जाणे हेच फायद्याचे ठरते.हे आपल्याला अनेक व्यवसायिकांच्या उदाहरणावरून दिसून येते. याच मुद्द्याला धरून जर आपण मध्यप्रदेश राज्यातील खरगोनचे दोन मित्र म्हणजेच एक वीरेंद्र पाटीदार आणि दुसरा सचिन पाटीदार यांचे उदाहरण घेतले तर हा मुद्दा आपल्याला पटेल. या दोन मित्रांनी दूध व्यवसायाला सुरुवात केली व आज या दूध व्यवसायातून ते महिन्याला पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. त्यांचीच यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 दूध व्यवसायातून हे दोन मित्र महिन्याला कमावतात पाच ते सहा लाख रुपये

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मध्यप्रदेश राज्यातील खरगोन येथील वीरेंद्र पाटीदार व सचिन पाटीदार या दोन मित्रांनी 2020 मध्ये दूध व्यवसाय करायचा म्हणून तीन गिर गाई विकत घेतल्या व डेरी व्यवसायाला सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने यामध्ये वाढ करत आज त्यांच्याकडे 15 गाई आणि 60 म्हशी असून या माध्यमातून ते दूध विक्रीतून महिन्याला पाच ते सहा लाख रुपये कमवत आहेत.

तसे पाहायला गेले तर हे दोन्ही मित्र व्यवसायाने शेतकरी असून ते खरगोन जिल्ह्यातील मंडलेश्वर या ठिकाणी राहतात. कायमच काहीतरी करावे यासाठी धडपडणारे या दोघांनी कोविड कालावधीमध्ये देखील शहरातील लोकांना सेंद्रिय भाजीपाला पुरवण्याचा व्यवसाय केला होता व त्यावेळेस त्यांना कळले की लोकांमध्ये शुद्ध दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना देखील मागणी आहे ही मागणी ओळखूनच त्यांनी दूध व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.

 त्यांच्या गोठ्यामध्ये आहेत 75 गाई आणि साठ म्हशी

अगोदर त्यांनी तीन गिर जातीच्या गाय विकत घेऊन या व्यवसायाला सुरुवात केली व दुधाची मागणी जशी जशी वाढायला लागली त्यासोबत त्यांनी काही गाई विकत घेतल्यावर त्यासोबत म्हशींची देखील खरेदी केली. त्यांच्या या फार्ममध्ये सध्या 12 गिर जातीच्या गायी असून तीन साहिवाल आणि एचएफ  या जातीचे क्रॉस ब्रिड असलेल्या  शंकर जातीच्या गायी आहेत.

एवढेच नाही तर त्यांच्याकडे आज 60 मुऱ्हा जातीच्या म्हशी देखील आहेत. या सगळ्या माध्यमातून ते श्री सिद्धिविनायक दूध आणि दुग्धजन्य पदार्थ या ब्रँड खाली दूध डेअरी देखील चालवतात. या गाई आणि म्हशीपासून त्यांना दररोज 500 लिटर दुधाचे उत्पादन मिळते. दूध काढण्यासाठी यंत्राचा वापर केला जातो

व जवळपास इतर शेतकऱ्यांकडून 300 ते 400 लिटर दुधाची खरेदी देखील ते करतात व दुकानातून दररोज 400 लिटर दुधाची विक्री करतात. त्यांनी गाईचे दूध हे पन्नास रुपये प्रति लिटर तर म्हशीचे दूध साठ रुपये प्रति लिटर प्रमाणे ते विक्री करतात. सर्व खर्च वजा जाता त्यांना महिन्याला एक ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न हाती मिळते.

 इतर दुग्धजन्य पदार्थांची देखील निर्मिती करतात

हे दोघेजण दूध विक्रीस नाही तर दुधापासून इतर दुग्धजन्य पदार्थ तयार करतात. लग्नसराई मध्ये मावा बनवून त्याची विक्री करतात तर श्रीखंडासाठी चक्का, पनीर तसेच तूप देखील  बनवतात. यामधून देखील त्यांना वेगळे उत्पन्न मिळते. दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी त्यांच्याकडे अत्याधुनिक मशीन आणि कोल्ड स्टोरेज देखील आहे.

महत्वाचे म्हणजे या यंत्रसामुग्रीसाठी सरकारकडून प्रधानमंत्री रोजगार योजना अंतर्गत 40 लाख रुपयांचे कर्ज त्यांनी घेतले व यामध्ये त्यांना 35 टक्के अनुदान देखील मिळाले आहे. त्यांनी मावा बनवण्याकरिता गुजरात मधून ऑटोमॅटिक मशीन खरेदी केले आहे व दूध थंड करण्यासाठी 1000 लिटरचे शीतकरण यंत्र तसेच तुपाचे पॅकिंग आणि दुधाची शुद्धता तपासण्यासाठी देखील मशिनरी बसवली आहे. त्यांनी आज पाच टन क्षमतेचे कोल्ड स्टोरेज उभारले आहे.

अशाप्रकारे सचिन आणि वीरेंद्र पाटीदार यांनी मागणी ओळखून व्यवसायाला सुरुवात करून कष्टाने आज यशस्वी करून दाखवला आहे. यावरून सिद्ध होते की व्यक्तीमध्ये जर जिद्द तसेच कठोर परिश्रम करण्याची क्षमता असेल तर व्यक्ती कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe