Car Loan: कार लोन घ्या परंतु ‘या’ 7 गोष्टींवर लक्ष ठेवा! नाहीतर येईल पश्चाताप करायची वेळ, वाचा माहिती

Ajay Patil
Published:
car loan

Car Loan:- जर तुम्हाला देखील कार खरेदी करायची असेल व त्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे खूप गरजेचे आहे. कारण कार लोन घेण्याअगोदर काही विशेष गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे असते.

नाहीतर कार लोन घेताना किंवा लोन घेतल्यानंतर काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जेव्हाही तुम्ही कार लोन घ्यायला जाल त्या अगोदर ज्या गोष्टींवर तुम्हाला लक्ष केंद्रित करायला लागते त्या गोष्टींविषयीचे महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात घेऊ.

 कार लोन घ्या परंतु या गोष्टींवर लक्ष ठेवा

1- क्रेडिट स्कोर चेक करा जर तुम्हाला कार लोन घ्यायचे असेल तर सगळ्यात अगोदर तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर तपासून पाहणे गरजेचे आहे. कारण तुमच्या क्रेडिट स्कोर वरून तुम्हाला मिळणाऱ्या कर्जाची रक्कम आणि कालावधी हा ठरत असतो. जर तुमचा क्रेडिट स्कोर 750 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला सहजरीत्या कार लोन मिळू शकते.

2- कमी कालावधी करिता घ्या लोन जर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही कमी कालावधी करिता कर्ज घेणे गरजेचे आहे. कारण यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे आर्थिक फायदे मिळतील. जसं की यामुळे तुम्हाला कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध होईल आणि तुम्ही लवकरात लवकर ते परतफेड करू शकाल. लवकरात लवकर तुम्ही पुढील बचतीला सुरुवात देखील करू शकतात. परंतु याकरिता तुम्हाला जास्त डाऊन पेमेंट करणे गरजेचे आहे.

3- जास्तीचे डाऊन पेमेंट करण्याचा प्रयत्न करणे तुम्हाला जर तुमच्या आवडीची कार खरेदी करायचे असेल तर याकरिता तुम्ही जास्त डाऊन पेमेंट देणे गरजेचे आहे. तुम्ही जर जास्त डाऊन पेमेंट दिले तर व्याजदर कमी होऊ शकतो. याकरिता तुम्ही कमीत कमी 20 टक्के रक्कम डाऊन पेमेंटसाठी भरणे गरजेचे आहे व जितके जास्त डाऊन पेमेंट तुम्ही जमा कराल तितका व्याजदर तुम्हाला कमी लागतो.

4- कर्ज घेण्यासाठी योग्य कालावधी निवडणे कार लोन घेण्यासाठी साधारणपणे सात वर्षांचा कालावधी हा योग्य ठरतो. त्यासाठी तुम्ही जास्त डाऊन पेमेंट देऊन कार खरेदी करू शकतात व तुम्हाला व्याज कमी लागते.

5- योग्य कालावधीची वाट पाहणे तुम्हाला जर कोणतीही कार खरेदी करायची असेल तर त्याकरिता तुम्ही वर्षाचे शेवटचे महिन्यात जसे की ऑक्टोंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर पर्यंत प्रतीक्षा करणे फायद्याचे ठरते. या कालावधीत अनेक सण उत्सव असतात व या प्रसंगी अनेक ऑफर देखील कंपनीकडून दिल्या जातात. याशिवाय फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये कोटा पूर्ण करण्यासाठी देखील कंपन्यांकडून डिस्काउंट ऑफर दिल्या जातात व या ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही कार खरेदी करू शकतात.

6- वेळेवर ईएमआय भरणे यासोबतच कार लोन घेतल्यानंतर प्रत्येक महिन्याला वेळेवर ईएमआय भरणे गरजेचे आहे. जर तुम्ही वेळेवर ईएमआय दिला नाही किंवा भरला नाही तर व्याज त्यावर वाढू शकते व तुमचा क्रेडिट स्कोर देखील खराब होऊ शकतो. तसेच पुढच्या हप्त्यासोबत तुम्हाला पेनल्टी देखील भरावी लागू शकते व त्यामुळे तुमचा आर्थिक बजेट बिघडू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe