सध्या सुशिक्षित बेरोजगार तरुण- तरुणींचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून त्या मला नाही उपलब्ध नोकऱ्यांची संख्या भारतात खूप नगण्य आहे. त्यामुळे बेरोजगारीची समस्या हा भारता पुढील एक ज्वलंत असा प्रश्न आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर महाराष्ट्रामध्ये एकूण 17000 जागांसाठी पोलीस भरती राबविण्यात येत आहे व त्याकरिता तब्बल 17 लाख उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत व यामध्ये प्रामुख्याने उच्च शिक्षित तरुणांचा समावेश आहे.
यावरून आपल्याला देशातील बेरोजगारीचे भयाण स्वरूप लक्षात येते. त्यामुळे हाताला काम मिळावे म्हणून अनेक तरुण आज वणवण भटकताना आपल्याला दिसून येतात. परंतु आता महाराष्ट्रासह भारतातील ड्रायव्हर अर्थात वाहन चालकांना नोकरीसाठी ते जर्मनीमध्ये जाण्याची संधी मिळणार आहे व त्याकरिता वाहन चालकांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्याची महत्त्वपूर्ण योजना महाराष्ट्र सरकारची आहे.
जर्मनीमध्ये नोकरीची संधी
आता आपण पाहिले तर अनेक तरुण हे देशांमध्ये नोकरीच्या संधी स्वतःला आपल्याला दिसून येतात व बऱ्याच देशांमध्ये नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. परंतु विदेशात नोकरीसाठी जाणे म्हणजे सगळ्यात अगोदर समस्या उद्भवते ती भाषेची व या समस्येमुळे अनेक तरुणांना परदेशात नोकरीला जाता येत नाही. जर आपण जर्मनीचा विचार केला तर त्या ठिकाणी आता सध्या एकूण चार लाख वाहन चालकांची गरज आहे.
त्यामुळे आता भारतातील एकूण चार राज्यातील वाहनचालकांना जर्मन भाषा शिकवली जाणार आहे व योग्य ते प्रशिक्षण देऊन अशा युवकांना थेट जर्मनीला पाठवले जाणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाकरिता महाराष्ट्राच्या परिवहन विभागाच्या माध्यमातून तयारी करण्यात आली असून या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी उद्योग मंत्री उदय सामंत,
राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच काही अधिकारी हे जर्मनीच्या दौऱ्यावर गेले होते व या दौऱ्याच्या माध्यमातून आर्थिक गुंतवणुकीवर चर्चा झाली. उदय सामंत यांनी मर्सिडीज बेंज या कंपनीच्या प्रतिनिधीशी देखील चर्चा केली. लवकरच महाराष्ट्रामध्ये एकूण तीन हजार कोटींचे गुंतवणूक ही कंपनी करणार आहे व त्यावर देखील या बैठकीत चर्चा झाली आहे.
एकूण चार राज्यातील तरुणांना आहे संधी
या देशांमध्ये तृतीया आणि चतुर्थी श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची खूप कमतरता आहे व त्या ठिकाणी त्यामुळेच मोठ्या मनुष्यबाची गरज आहे. यामध्ये वाहन चालकांची देखील कमी असून त्यामुळे भारतातील तरुणांना आता जर्मनीमध्ये ड्रायव्हर होण्याची मोठी संधी चालून आली आहे.
भारतातील महाराष्ट्र तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा याच्या राज्यातील तरुणांना वाहनचालकांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे व त्यामुळे आता भविष्यात तरुणांना थेट परदेशात नोकरी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.