अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- साठवण तलावात तुम्ही केलेल्या पापाची शिक्षा श्रीरामपूरची जनता भोगत आहे, असा पलटवार करून पावसामुळे वीजपुरवठ्यात आलेल्या तांत्रीक बाबींमुळे पाणीपुरवठ्यास विलंब होत आहे,असे सत्ताधारी नगरसेवक राजेंद्र पवार यांनी म्हटले आहे.
शहर काँग्रेसच्यावतीने पालिका प्रशासनाच्या विरोधात हंडा आंदोलन करण्यात आले त्याबाबत ते म्हणाले, पाणीपुरवठ्यासंदर्भात आंदोलन करत आहेत त्यांनी खालील बाबींशी तपासणी केली का?
2012 नंतर प्रथमच एवढा मोठा पाऊस झालेला आहे. त्यामुळे विजेच्या तांत्रीक बिघाडाला नगरपरिषद जबाबदार नसते हे आपल्या सारख्या सुज्ञ माणसाला समजायला पाहिजे.
पावसामुळे तुमच्या काळातील वीजपुरवठ्यात आलेल्या तांत्रीक बाबींमुळे पाणीपुरवठ्यास विलंब होत होता, हे उपनगराध्यक्ष विसरलेले दिसतात.
गेल्या 10 ते 12 वर्षांपासून शहरातील जलकुंभाची साफ सफाई केलेली नव्हती ती सफाई करण्यात आली. माजी खासदार स्व. गोविंदराव आदिक,
माजी आमदार स्व. ज. य. टेकावडे, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या सहकार्याने झालेल्या नवीन साठवण तलावाचा पाझर तलाव झालेला आहे.
कोट्यावधी रुपये खर्चून करण्यात आलेल्या साठवण तलावाच्या फरश्या, कागद नित्कृष्ठ कामामुळे निघालेल्या आहेत. साठवण तलावात तुम्ही केलेल्या पापाची शिक्षा श्रीरामपूरची जनता भोगत आहे.
हे हार्ड रॉक जनता विसरलेली नाही. टायफाईडची साथ आपल्याच काळात आली होती हेही उपनगराध्यक्ष विसरलले दिसतात.
आपल्या काळात अनेक वेळा पाणीपुरवठा होत नव्हता तेंव्हा लोकांना कसल्याच प्रकारे सुचना अथवा निरोप मिळत नव्हते हे आपण विसरला असाल पण जनता नाही विसरली, असेही नगरसेवक राजेंद्र पवार यांनी म्हटले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved