आयसीआयसीआय बँकेने सुरू केली ग्राहकांसाठी नवीन अशी उत्तम सेवा; आता ग्राहकांच्या खाते राहणार सुरक्षित

Ajay Patil
Published:
icici bank

देशामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच एचडीएफसी बँक आणि त्यासोबतच आयसीआयसीआय बँक या महत्त्वाच्या बँक असून या बँकांचे कोटीच्या संख्येमध्ये ग्राहक आहेत. त्यामुळे या बँकांच्या माध्यमातून ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकारच्या उपाययोजना करण्यात येतात. अगदी याच प्रकारे आता आयसीआयसीआय बँकेने देखील ग्राहकांच्या खात्याच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचे सेवा सुरू केली

असून या सेवेच्या माध्यमातून आता ग्राहकांना इंटरनेट तसेच क्रेडिट आणि डेबिट कार्ड सेवा लॉक आणि अनलॉक करता येणार आहेत व याकरिता बँकेने स्मार्ट लॉक नावाचे फिचर लॉन्च केले आहे. या सेवेच्या माध्यमातून आता आयसीआयसीआय बॅंकांच्या ग्राहकांना त्यांचे खाते सुरक्षित ठेवता येणार आहे.

 आयसीआयसीआय बँकेने सुरू केली ग्राहकांसाठी नवीन सेवा

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आयसीआयसीआय बँकेच्या माध्यमातून देशातील कोट्यावधी आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना आता त्यांचे खाते सुरक्षित करता येणार आहे. याकरता आयसीआयसीआय बँकेने स्मार्ट लॉक हे नवीन फिचर लॉन्च केले असून या फिचरच्या साह्याने आता इंटरनेट तसेच क्रेडिट आणि डेबिट कार्ड सेवा ग्राहकांना लॉक आणि अनलॉक  करता येणार आहे.

ग्राहकांना बँकेची ही सेवा फोन किंवा ई-मेलच्या माध्यमातून कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हच्या मदतीशिवाय सुरू करता येणार आहे. या स्मार्ट लॉकच्या माध्यमातून आता अनेक बँकिंग सेवा लॉक आणि अनलॉक करता येणार आहे.

 हे ॲप करेल ग्राहकांना मदत

ग्राहकांना लॉक आणि लॉक करण्यासाठी iMobile pay हे ॲप्लिकेशन मदत करेल व ग्राहकांना एका बटनाच्या क्लिक वर इंटरनेट बँकिंग, त्यांचे खात्याशी जोडलेला इतर उपयोग करून पेमेंट तसेच क्रेडिट आणि डेबिट कार्डचा प्रवेश लॉक आणि अनलॉक करण्यास मदत करेल. म्हणजेच आता आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना विशिष्ट कालावधीमध्ये एखादी विशिष्ट बँकिंग सेवा ऍक्टिव्ह किंवा इन ऍक्टिव्ह करण्यासाठी या सेवेचा फायदा होणार आहे. तसेच या फिचरचा वापर एखाद्या फसव्या व्यवहारांपासून ग्राहकांच्या खात्याचे संरक्षण करण्यासाठी देखील करता येणार आहे.

 कशी वापरता येणार स्मार्टलॉक सेवा?

1- याकरिता सगळ्यात अगोदर iMobile pay मध्ये लॉगिन करावे लागेल.

2- त्यानंतर होम स्क्रीनच्या अगदी तळाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला स्मार्ट लॉक वर क्लिक करावे लागेल.

3- तुम्हाला लॉक आणि लॉक करायचे असलेल्या प्रमुख बँकिंग सेवांवर क्लिक करावे लागेल.

4- तसेच व्हेरिफाय करण्यासाठी स्वाईप करावे लागेल.

iMobile pay वापरण्याकरिता कोणत्याही बँकेतील ग्राहक त्यांचे बँक खाते या ॲप्लिकेशनशी लिंक करू शकता व यूपीआय आयडी जनरेट करू शकतात आणि व्यवहार सुरू करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe