अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- मौजे घोगरगाव (ता. नेवासा) येथील सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी कमलाकर शिरसाठ यांनी जिल्हाधिकारी कार्यालय जवळील भूजल सर्व्हेक्षणाच्या कार्यालयाच्या परिसरात उपोषण केले.
नेवासा तालुक्यातील मौजे घोगरगाव येथे काही इसमांनी कचराकुंडी वापरुनआंबेडकर रोडवर मधोमध झेंडा उभा केला आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे
. सदरचे अतिक्रमण काढण्यासाठी शासन दरबारी तक्रार करुन देखील याची दखल घेतली जात नाही. अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायतीला नियमाप्रमाणे विनंती अर्ज केला.
परंतु त्यांनी नोटीस देण्याच्या पलीकडे काहीही कारवाई केलेली नाही. ग्रामपंचायतीने अशा लोकांवर कार्यवाही करणे गरजेची होती. पोलीस निरीक्षक यांना समक्ष भेटून अतिक्रमण काढण्याबाबत पत्र दिले होते.
त्यांनी गट विकास अधिकारी असल्याशिवाय बंदोबस्त देऊ शकत नसल्याचे सांगितले. तसेच पोलीस नाईक कोळपे हे घोगरगावचे बीट हवलदार असून ते गैरअर्जदार यांच्या संपर्कात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
मौजे घोगरगाव येथील ग्रामपंचायतचा रस्ता आंबेडकर रोडवरील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करुन नागरिकांची दळणवळणाची गैरसोय दूर करावी, अतिक्रमण न काढता टोळवाटोळवी करणार्या अधिकार्यांची बदली करावी,
राष्ट्रपुरुषांचा झेंडा कचराकुंडीत लावून त्याचा अपमान करणार्यांवर कार्यवाही करण्याची मागणी उपोषणकर्ते शिरसाठ यांनी केली आहे. या उपोषणाप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य सचिव प्रा.किसन चव्हाण,
प्रकाश भोसले, योगेश गुंजाळ, योगेश साठे, शंकरराव शिरसाठ, प्रसाद सातूरे, सिद्धार्थ साळवे, सागर शिरसाठ, अशोक म्हस्के, सुनिता कानडे आदि उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved