अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- श्रीरामपूर शहरालगत आठवडी शिवारात एका ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा जप्त केल्याची घटना घडली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी कि, पोलीस उपअधिक्षक दिपाली काळे यांना गुप्त माहिती मिळाली की एकलहरे आठवाडी शिवारात आसलेल्या गोदामात मोठ्या प्रमाणात गुटखा उतरविला जाणार आहे
त्या प्रमाणे पोलिस उपअधिक्षक दिपाली काळे यांनी उपविभागीय अधिकारी राहुल मदने यांना कारवाईच्या सुचना दिल्या. त्या नुसार पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी पोलीस पथका समवेत गोदामात छापा टाकला
गोदामात मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला. पोलीसांनी सर्व माल जप्त केला असुन कारवाई करण्याचे काम सुरु असल्याचे पोलीसांनी सांगितले
या छाप्प्याबाबत परिसरात वेगवेगळी चर्चा चालु असुन दोन गुटखा व्यापाऱ्यांच्या व्यावसायिक स्पर्धेतुन ही टिप देण्यात आल्याची चर्चा सुरु आहे.
काही दिवसापूर्वी अशाच प्रकारे गुटखा पकडण्यात आला होता, परंतु काहीच कारवाई झाली नाही. आपला माल आपलाच धंदेवाला पकडून देत असल्याच्या कारणातुन ही पक्की खबर देण्यात आल्याची चर्चा चालु आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved