महिलांनी मांडले तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-   मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या शिष्ठमंडळाने नगर तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन करून तहसीलदार उमेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.

मराठा क्रांती मोर्चाच्या महिला आघाडी केंद्र व राज्य सरकारकडे अनेक दिवसांपासून अरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी शांततेच्या व संयमाच्या मार्गाने पाठपुरावा करीत आहे.

मात्र अद्याप सरकारला जाग न आल्याने मराठा समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. मराठा समाजाच्या सहनशीलतेचा आणखी अंत न पाहता राज्य सरकारने तातडीने पावले उचलून मराठा समाजाला अरक्षण द्यावे अन्यथा सकाळ मराठा समाज तीव्र आंदोलनाचा पवित्रा पुन्हा घेईल.

असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी अॅड.अनुराधा येवले, अशा साठे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सुपर्णा सावंत, नगरसेविका संध्या पवार, कांता बोठे, मंगला शिरसाठ, मिनक्षी वाघस्कर,

शारदा पवार, शोभा भालसिंग, अनिता काळे आदी महिला उपस्थित होत्या. दरम्यान प्रलंबित सर्व मागण्यांचा सरकारने त्वरित निर्णय घेणे अपेक्षित आहे.

सदर मागण्यांबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाचा वणवा पुन्हा पेटल्यास त्यास केंद्र व राज्य सरकार पूर्णतः जबाबदार राहील.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment