एका चार्जवर 230 किलोमीटर धावणारी ‘ही’ सर्वात छोटी आणि स्वस्त इलेक्ट्रिक कार महागली, वाचा किती द्यावे लागणार पैसे?

Ajay Patil
Published:
mg comet ev

भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनामध्ये ज्या काही अग्रेसर आणि महत्त्वाच्या कंपन्या आहेत त्यामध्ये एमजी मोटर्स इंडिया ही कंपनी देखील एक  नामांकित आणि प्रसिद्ध कंपनी आहे. देशामध्ये अनेक कंपन्यांनी अलीकडच्या कालावधीमध्ये अनेक प्रकारच्या इलेक्ट्रिक कार बाजारपेठेत सादर केल्या आणि काही येणाऱ्या काही दिवसात लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.

परंतु या सर्व कंपन्यांमध्ये एमजी मोटर इंडियाचे देखील मोठ्या प्रमाणावर ग्राहक आहेत. या पार्श्वभूमीवर तुम्हाला देखील इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल व ती देखील एमजी मोटर इंडियाची तर तुमच्यासाठी एक धक्का देणारी बातमी आहे. कारण या कंपनीने गेल्या वर्षी भारतामध्ये  MG Comet EV ही लहान इलेक्ट्रिक कार सादर केली होती.

या कारमध्ये कंपनीने दोन डोअर इलेक्ट्रिक कार  अनेक नवीन तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्यांनी ती सज्ज अशी तयार करण्यात आली होती. यासोबत या कारमध्ये कंपनीने अनेक खास वैशिष्ट्ये दिलेले आहेत. एमजी मोटर इंडियाची ही इलेक्ट्रिक कार देशातील  सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार म्हणून ओळखली जाते. परंतु आता कंपनीने या कारच्या किमतीमध्ये वाढ केली आहे व त्यामुळे आता जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत.

 सिंगल चार्जर धावते 230 किलोमीटर

जर आपण एमजी मोटर इंडियाच्या एमजी कॉमेट ईव्ही या कारची वैशिष्ट्य पाहिले तर यामध्ये 17.3kWh लिथियम आयन बॅटरी वापरण्यात आली आहे व या इलेक्ट्रिक कारची इलेक्ट्रिक मोटर 42 पीएस पावर आणि 110 एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार तुम्ही सिंगल चार्ज केल्यानंतर 230 किलोमीटरची रेंज येते. 3.3kW चार्जरने तुम्ही जर ही बॅटरी चार्ज केली तर सुमारे सात तास लागतात तर पाच तासात तिची बॅटरी 80% चार्ज होते.

या कारमध्ये 10.25 इंचाची स्क्रीन आहे व ती टचस्क्रीन युनिट इन्फोटेनमेंट युनिट म्हणून काम करते. तसेच ड्रायव्हरच्या समोर देखील एक स्क्रीन असून ती इन्स्ट्रुमेंटेशनसाठी वापरली जाते. तसेच या कारमध्ये स्वयंचलित हवामान नियंत्रण तसेच पुढील आणि मागील एअर बॅग देखील देण्यात आले आहेत. मागच्या बाजूला पार्किंग सेन्सर्स,

रिवर्सिंग कॅमेरा आणि मल्टिपल एअर बॅग्स, एलईडी हेडलाईट, ॲम्बिइंट लाईट, कनेक्टेड कार टेक, एप्पल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी सारखी वैशिष्ट्ये देखील उपलब्ध आहेत. सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एमजी कॉमेट देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार म्हणून प्रसिद्ध असून तिला ग्राहकांकडून पसंत देखील केले जाते.

 एमजी कॉमेटची किंमत किती वाढवण्यात आली?

एमजी मोटर्स इंडियाने त्याच्या एक्सलसिव्ह आणि एक्साइट प्रकारांच्या किमतींमध्ये साधारणपणे 11000 पासून ते 13000 रुपयांनी वाढ केली आहे. मात्र कॉमेट ईव्हीच्या इव्हरग्रीन लिमिटेड एडिशनच्या किमतीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. आता या कारची किंमत सहा लाख 99 हजार ते नऊ लाख 40 हजार रुपये इतकी असून या किमती एक्स शोरूम आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe