अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- सरकारी कार्यालये व कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना लाच स्वीकरल्याच्या घटनांमध्ये हल्ली वाढ झाल्याचे चित्र सध्या दिसते आहे.दरम्यान नुकतीच श्रीगोंदा मध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे.
सावकाराविरोधात कारवाईसाठी तक्रारदाराकडे १० हजार रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी श्रीगोंदा येथील सहायक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी श्रेणी १(वर्ग ३) बापुसाहेब खंडेराव शिवरकर,
( वय 48 वर्षे, रा.फ्लॅट नं – 24, धनश्री अपार्टमेंट, स्टेशन रोड, श्रीगोंदा, जि नगर ) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत
श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार यांनी एका सावकाराविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून त्या सावकाराविरुध्द कारवाई करिता लागणारे खर्चाचे नावाखाली आरोपी लोकसेवक लाचेची मागणी करत
असल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरूनदि.29/09/2020 रोजी आयोजित लोकसेवक यांनी पंचा समक्ष रुपये 10000/- लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार आरोपी विरुद्ध श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून आरोपीस ताब्यात घेतले आहे.
एसीबीचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्याम पवरे, दिपक कारंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved