अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य संघटनेची अहमदनगर शहरात संघटनेचे प्रदेश महासचिव डॉ. परवेज़ अशरफी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
या बैठकीत संघटनेची सविस्तर माहिती डॉ. परवेज अशरफी यांनी दिली. ही संघटना मुस्लिम समाजाच्या हक्कासाठी, आरक्षण, स्व:रक्षण आणि समाजातील अनेक प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी बांधिल आहे.
या बैठकीत जिल्ह्याचे व शहरात संघटन मजबूत करण्यासाठी पदाधिकारी नेमण्यात आले. या बैठकीत शहरातील सामाजिक कार्यकर्ते अमीर खान यांची शहराध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
निवडीचे पत्र प्रदेश महासचिव डॉ.परवेज अशरफी यांच्या हस्ते देण्यात आले. या बैठकीत संघटनेचे जिल्हाध्यक्ष हाजी जावेद, उपाध्यक्ष मुफ़्ती अल्ताफ,
जिल्हा सचिव फिरोज शेख, क़दीर शेख, शाहनवाज़ तांबोळी, शाहबाज़ सय्यद, इमरान शेख, मूसैफ़ शेख, कय्यूम कुरेशी, शाहबाज़ खान, शाहरुख खान, फैज़ान कुरेशी, मुन्ना शेख आदि उपस्थित होते.
निवडीनंतर अमीर खान यांनी सर्वांचे आभार मानून संघटनेच्या कामाकाज सक्रिय सहभाग देऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करु. आरक्षणासह समाजातील प्रश्नांना प्राधान्य राहिले, असे सांगितले.
उपस्थितांनी नूतन शहराध्यक्ष अमीर खान यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अमीर खान यांची निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved