पावसाळ्यात ‘ही’ बूस्टर ड्रिंक प्या आणि होणाऱ्या आजारांपासून स्वतःचे रक्षण करा; रहाल फिट आणि मजबूत

Ajay Patil
Published:
immunity booster drink

सध्या पावसाळ्याचा कालावधी सुरू आहे व या पावसाच्या कालावधीमध्ये बऱ्याचदा आपल्याला व्हायरल इन्फेक्शनचा धोका संभवतो. कारण पावसाळा सुरू होण्याआधी सप्ताह उन्हाळा असतो व उन्हाळा आणि पावसाळा यादरम्यानच्या कालावधीमध्ये अशा प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन  मोठ्या प्रमाणावर पसरतात.

कारण या कालावधीमध्ये हवेमध्ये आद्रता असल्याने अनेक प्रकारच्या जिवाणू आणि विषाणूंची वाढ देखील वेगात होते. त्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता जास्त असते. परंतु शरीराचे रोगप्रतिकारक शक्ती जर मजबूत असेल तर  अशा प्रकारच्या संसार्गापासून आपल्याला स्वतःचे संरक्षण करता येते.

परंतु शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत आणि टिकवून ठेवायची असेल तर नक्कीच आरोग्याकडे लक्ष द्यावे लागते व त्याकरिता आहार आणि काही महत्त्वाची इम्युनिटी बूस्टर ड्रिंक पिणे देखील फायद्याचे ठरते व यामुळे स्वतःला इन्फेक्शन पासून वाचवता येते.

 पावसाळ्यात ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पेय प्या आणि स्वतःला फिट ठेवा

1- हळदीचे दूध आपल्याला माहिती आहे की हळद हे औषधी गुणधर्म असलेला पदार्थ असून यामध्ये असलेली कर्क्युमिन मध्ये दाहक विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. जर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करायला मदत करतात.

हे ड्रिंक  तयार करण्यासाठी एक ग्लास गरम दूध घ्यावे व त्यामध्ये 1/2 चमचे हळद आणि चवीनुसार मध किंवा गूळ घ्यावा. नंतर गरम दुधामध्ये हे सर्व चांगले मिसळून घ्यावे व कोमट करून त्याला प्यावे.

2- आवळा आणि आल्याचा रस आपल्याला माहिती आहे की आवळ्यामध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणावर असते व त्यामुळे शरीराचे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडते. त्यासोबतच आल्यामध्ये दाहक विरोधी आणि सूक्ष्मजीव विरोधी गुणधर्म देखील असतात.

त्यामुळे हा पावरफुल रस बनवण्यासाठी तुम्ही दोन आवळा, एक इंच आल्याचा तुकडा, एक ग्लास पाणी आणि मध घ्यावे. त्यानंतर आवळा आणि आले बारीक करून त्याचा रस काढावा व त्यात पाणी आणि मध मिसळावे. अशाप्रकारे हा तयार रस तुम्ही पिऊ शकतात आणि स्वतःला फिट ठेवू शकतात.

 खालील पेय आठवड्यातून तीन वेळा प्या आणि आजारांपासून दूर राहा

1- तुळस तुळशीमध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटिबॅक्टेरियल गुणधर्म मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप मदत होते. तुळशीचा पेय तयार करण्यासाठी दहा ते बारा तुळशीची पाने तसेच एक इंच आल्याचा तुकडा,1/2 चमचा काळी मिरी पावडर आणि दोन कप पाणी आणि मध घ्यावे व पाण्यामध्ये तुळशीची पाने, आले आणि काळी मिरी घालून उकळून घ्यावे व नंतर थोडे थंड करून गाळून मध मिसळून प्यावे.

2- गाजर आणि बीट रूटचा रस बीट रूट आणि गाजर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे व हे दोन्हीमध्ये विटामिन ए, विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असतात व ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला मदत करतात.

हे करण्यासाठी एक मध्यम आकाराची बीट रूट, दोन गाजर तसेच एक छोटा तुकडा आल्याचा आणि एक ग्लास पाणी व लिंबाचा रस घ्यावा. तुम्ही यामध्ये बीट रूट, गाजर आणि आले सोलून त्याचे छोटे तुकडे देखील करू शकतात व ब्लेंडर मध्ये ठेवून त्याला पाण्याने बारीक करावे व नंतर लिंबू मिसळून प्यावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe