द्विपक्षीय नवनिर्वाचित सभापतींनी केले सभेचे आयोजन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापदी पदाच्या निवडणुकीदरम्यान भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले मनोज कोतकर यांनी स्थायी समितीची सभा निश्‍चित केल्याची चर्चा महापालिकेत सुरु आहे.

दरम्यान हि सभा शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. सभापतिपदी वादग्रस्त निवड झाल्यानंतर सुरू झालेली चर्चा थांबविण्यासाठी मनोज कोतकर यांनी स्थायी समितीची घाईघाईने सभा काढली.

कोतकर अद्यापही आपल्याच पक्षात असल्याचा दावा भाजप करत आहे. तर राष्ट्रवादीत प्रवेश करून स्थायी समितीचे सभापतीपदावर विराजमान झालेले कोतकर नेमके कोणत्या पक्षाचे आहे.

याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. या चर्चा कोतकरांसाठी अडचणीच्या ठरत आहे. एक सभा झाल्यानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळेल, असा त्यांचा अंदाज आहे.

त्यामुळे शुक्रवारी स्थायी समितीची सभा निश्‍चित करण्यात आल्याची चर्चा महापालिकेत आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने ही सभा होणार आहे.

या सभेत नगरसेवक स्वेच्छा निधीतून विद्यूत साहित्य खरेदी करण्याचा प्रस्ताव चर्चेसाठी आला आहे. हा विषय महत्त्वाचा मानला जातो.

या बरोबरच काही करांची बिले निर्लेखित करणे, कंत्राटी पद्धतीने कामावर असलेल्यांची पूनर्नियुक्ती करणे, कंत्राटी वायरमन नियुक्त करणे, बुरूडगाव येथे पाच केएलडी क्षमतेचा ईटीपी दुरूस्त करणे आदी प्रस्ताव सभेसमोर मंजुरीसाठी आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment