घर बांधायचे असेल तर हा कालावधी आहे योग्य! बांधकामासाठी आवश्यक असलेले स्टीलचे दर झाले कमी, वाचा सध्या काय आहे भाव?

Published on -

घर बांधायचे म्हटले म्हणजे सध्या ते प्रत्येकाला शक्य होईल असे चित्र दिसून येत नाही. कारण घर बांधण्यासाठी लागणारे जे काही बांधकाम साहित्य आहे त्याच्या प्रत्येकाच्या दरामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आपल्याला गेल्या कित्येक महिन्यांपासून दिसून येत आहे. घराच्या बांधकामाकरिता प्रामुख्याने ज्याप्रमाणे सिमेंट तसेच विटांची गरज असते.

अगदी तेवढीच महत्त्वाची गरज ही लोखंड म्हणजेच स्टीलची असते. तसे पाहायला गेले तर घर बांधण्यामध्ये प्रमुख खर्च हा लागणाऱ्या स्टीलवरच करावा लागतो हे देखील तेवढे सत्य आहे. परंतु सध्याचा कालावधी हा पावसाळ्याचा असल्यामुळे बरेच जण या कालावधीमध्ये घर बांधण्याचे काम टाळतात. या कालावधीमध्ये पावसामुळे अनेक प्रकारच्या समस्या घर बांधकामांमध्ये निर्माण होण्याची शक्यता असते

व त्यामुळेच या कालावधीत घर बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरांमध्ये देखील घट होते. अशाच प्रकारची घट सध्या आपल्याला आपल्याला स्टीलच्या दरांमध्ये दिसून येत असून स्टीलचे दर चक्क अर्ध्यावर आले आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील जर घर बांधायचे असेल तर हा कालावधी एक उत्तम कालावधी आहे.

या स्टीलचे दर कमी होण्यामागे ज्याप्रमाणे पावसाळ्याचा कालावधी कारणीभूत आहे. अगदी त्याचप्रमाणे सरकारचे काही प्रयत्न व बाजारपेठेवर परिणाम करणारे काही हंगामी स्वरूपातील घटक देखील तितकेच कारणीभूत आहेत. याच अनुषंगाने आपण या लेखामध्ये सध्या देशातील प्रमुख असलेल्या शहरांमध्ये लोखंडी सळ्या अर्थात स्टीलचे दर काय आहेत? याबाबतची माहिती बघणार आहोत.

 देशातील प्रमुख शहरांमध्ये असलेले सध्याचे स्टीलचे दर

1- रायपूर43 हजार रुपये

2- कानपूर36 हजार रुपये

3- रायगड 42 हजार 300 रुपये

4- कोलकत्ता 43 हजार 600 रुपये

5- दुर्गापुर 43 हजार 100 रुपये

6- गोवा 48 हजार 600 रुपये

7- इंदोर 47 हजार पाचशे रुपये

8- जालना 47 हजार 700 रुपये

9- मुंबई 48 हजार आठशे रुपये

10- नागपूर 48 हजार दोनशे रुपये

( टीप वर उल्लेख केलेले दर हे TMP बारा एमएम लोखंडाचे आहेत.)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News