पावसाळ्यामध्ये ‘हे’ पाणी अंगाला लावा आणि स्वतःपासून डासांना चार हात लांब ठेवा; पावसाळ्यातील वाढलेल्या डासांचा नाही होणार त्रास

सध्या पावसाळ्याचा कालावधी सुरू असून पडणाऱ्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाण्याचे डबके साचतात व बऱ्याच ठिकाणी छोट्या-मोठ्या प्रमाणामध्ये पाणी तुंबून राहते व ओलसरपणा देखील सगळीकडे असतो. अशाप्रसंगी यामध्ये डासांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढते. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये डासांचे प्रमाण वाढल्याने रात्रीच्या वेळी असो किंवा दिवसा बऱ्याचदा आपल्याला डासांचा उपद्रव जाणवायला लागतो व मोठ्या प्रमाणावर डास चावा घेत असतात.

डासांच्या अशा प्रकारच्या चावण्यामुळे व्यक्ती आजारी देखील पडू शकतो. त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीमध्ये या वाढलेल्या डासांपासून स्वतःचा बचाव करणे खूप गरजेचे असते व याकरिता आपण अनेक प्रकारचे उपाययोजना करत असतो. परंतु तरी देखील याचा हवा तेवढा अपेक्षित परिणाम आपल्याला दिसून येत नाही.

यामध्ये आपण काही कॉइल्स किंवा रिपेलेंट क्रीम वापरतो व यामध्ये केमिकल असल्यामुळे ते देखील शरीराला कधी कधी धोकादायक ठरू शकते व लहान मुलांना याचा धोका उद्भवू शकतो. अशावेळी काय करावे म्हणून एक सोपी पद्धत loudmumma and butbaby.india नावाच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर करण्यात आलेली आहे. याबद्दलची माहिती येथे बघू.

 हे पाणी अंगाला लावा आणि डासांना दूर पळवा

त्यामध्ये तुम्हाला घरच्या घरी एक लिक्विड तयार करायचे आहे व जे लिक्विड लावल्यामुळे तुमच्या आजूबाजूला डास फिरकणार नाहीत. तुम्हाला जर घरच्या घरी हे लिक्विड तयार करायचे असेल तर त्याकरिता सगळ्यात अगोदर तुम्हाला एका वाटीमध्ये एक चमचा कापूरची पावडर टाकावी लागेल. त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे कडुलिंबाचे तेल टाकावे आणि एक चमचा खोबरेल तेल टाकून घ्यावे.

या तिन्ही पदार्थांचे मिश्रण एकत्र व्यवस्थितरित्या मिक्स म्हणजेच कालवून घ्यावे आणि शक्य असेल तर ते एखाद्या स्प्रे बाटलीमध्ये भरून ठेवावे. अशाप्रकारे जे हे लिक्विड म्हणजेच तेल तुम्ही अंगाला लावले तर घरात डास असले तरी तुमच्या अंगाला किंवा तुमच्या आजूबाजूला ते फिरणार नाहीत. घरामध्ये लहान मुले असतील किंवा ते बाहेर कुठे खेळायला जात असतील तर त्या अगोदर आठवणीने हे तेल त्यांना लावून पाठवले तर मुलांचे डासांपासून संरक्षण होते व त्यांच्या आजूबाजूला डास फिरकत नाहीत.