Education Scholarship:- सध्या जर आपण उच्च शिक्षणाचा खर्च पाहिला तर तो सर्वसामान्य नागरिकांना परवडण्यासारखा नाही. कारण उच्च शिक्षणासाठी प्रचंड प्रमाणात शैक्षणिक शुल्क आकारले जाते व ते काही लाखांमध्ये असते. अशाप्रसंगी भारतात शिक्षण घेणे बऱ्याच जणांना कठीण जाते तर परदेशात शिकण्याचे स्वप्न तर लांबच राहते.
अशा परिस्थितीमध्ये आर्थिक स्थितीमुळे एखाद्या विद्यार्थ्याचे शिक्षण अर्धवट राहू नये याकरिता सरकारच्या माध्यमातून स्कॉलरशिप योजना राबवल्या जातात. अशा योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात येते व त्यांचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. अशाच प्रकारची एक स्कॉलरशिप योजना महत्त्वाची असून तिचे नाव राजश्री छत्रपती शाहू परदेशी शिष्यवृत्ती योजना असे आहे.
ही योजना राज्यातील अनुसूचित जातीच्या मुला मुलीं करिता उपयुक्त ठरताना आपल्याला दिसून येत आहे. ज्या विद्यार्थ्यांना 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता अर्ज करायचा असेल त्यांना अर्ज करता येणार आहे.
राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून ही शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. राज्यातील नवबौद्ध प्रवर्गातील, अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाकरिता ही शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून पदव्यूत्तर पदविका, पदव्यूत्तर पदवी आणि पीएचडीचे शिक्षण घेण्याकरिता मदत केली जाते व या माध्यमातून राज्यातील 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कसा कराल अर्ज?
1- राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज डाऊनलोड करावा लागेल.
2- त्यानंतर तो अर्ज व्यवस्थित भरून लागणारे आवश्यक सगळ्या कागदपत्रांसह समाज कल्याण आयुक्तालय 3, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे-411001 या पत्त्यावर पाठवायचा आहे.
3- त्यानंतर या अर्जावर समाज कल्याण अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाते व त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर 75 विद्यार्थी निवडले जातात.
4- त्यामध्ये निवड झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना विमान प्रवासाचे भाडे तसेच परदेशातील शैक्षणिक संस्थेचे शैक्षणिक शुल्क तसेच निर्वाह भत्ता व आकस्मिक खर्च यांचा लाभ दिला जातो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी या अटी पूर्ण करणे गरजेचे
1- या योजनेचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
2- अर्जदाराचे वय पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता 35 आणि पीएचडी करता 40(कमाल)वर्ष असावे.
3- एवढेच नाही तर भारतीय आयुर्वेद ज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील एमडी आणि एमएस अभ्यासक्रम प्रवेशासाठी देखील पात्र असतील.
4- तसेच इच्छुक विद्यार्थ्यांना परदेशातील जागतिक रँकिंगमध्ये 200 च्या आत असलेल्या ज्या काही शिक्षण संस्था किंवा विद्यापीठे आहेत त्यामध्ये प्रवेश मिळालेला असणे गरजेचे आहे.
5- तसेच संबंधित विद्यार्थ्यांनी दिलेल्या विहित कालावधीमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करणे देखील बंधनकारक आहे.
काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?
राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेकरिता राज्यातील अनुसूचित जाती, नव बौद्ध प्रवर्गातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार असून त्यामध्ये 30 टक्के जागा मुलींसाठी राखीव आहेत. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पदव्युत्तर परीक्षेमध्ये कमीत कमी 75 टक्के गुण असणे गरजेचे आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2024 असून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.